NED vs SL | हेल्मेट न घातल्याचा श्रीलंकेला मोठा फटका, व्हीडिओ व्हायरल
Netherlands vs Sri Lanka | चुक एकाची शिक्षा पूर्ण टीमला. हेल्मेट न घातल्याने श्रीलंकेला मोठा झटका. नक्की काय झालं? पाहा व्हायरल व्हीडिओ.
लखनऊ | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये 21 ऑक्टोबरला डबल हेडर सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात नेदरलँड्स विरुद्ध श्रीलंका आमनेसामने आहेत. नेदरलँड्सने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय केला. नेदरलँड्सने 49.4 ओव्हरमध्ये ऑलआऊट 262 धावा केल्या. त्यामुळे श्रीलंकेला वर्ल्ड कपमधील पहिला विजय मिळवण्यासाठी 263 धावांची गरज आहे.या सामन्यादरम्यान श्रीलंकेला हेल्मेट न घालणं चागलंच महागात पडलंय. एका खेळाडूच्या चुकीमुळे श्रीलंकेला मोठा फटका सहन करावा लागला. नक्की काय झाल ते आपण सविस्तर जाणून घेऊयात.
प्रवास असो की क्रिकेट सामना, सुरक्षेसाठी हेल्मेट महत्त्वाचाच. मात्र अनेकदा सांगूनही हेल्मेटचा वापर केला जात नाही. ही चूक श्रीलंकेचा कॅप्टन आणि विकेटकीपर कुसल मेंडीस याला महागात पडली. त्याच्या एकट्याच्या चुकीचा फटका टीमला बसला. कुसलने नेदरलँड्सच्या बॅटिंगदरम्यान मिस फिल्डिंग केली. आता तु्म्ही म्हणाल यात हेल्मेटचा काय संबंध हे समजून घेऊयात.
चमिका करुणारत्ने नेदरलँड्सच्या डावातील 43 वी ओव्हर टाकायला आला. त्याने पहिल्या बॉलवर 1 धाव दिली. आता दुसरा बॉल टाकला. बॅट्समनला बॉल टोलवता आला नाही. त्यामुळे सुटलेला बॉल एक टप्पा पडून विकेटकीपर कुसल मेंडीसच्या दिशेने गेला. मात्र कुसलकडून तो बॉल मिस झाला. कुसलकडून मिस झालेला बॉल त्याच्या मागे असलेल्या हेल्मेटवर जाऊन आदळला. नियमानुसार बॉल हेल्मेटला लागल्यास दंड म्हणून 5 धावा देण्यात येतात. त्यानुसार नेदरलँड्सच्या खात्यात या 5 धावा जोडल्या गेल्या. कुसलच्या एका चुकीमुळे श्रीलंकेला 5 धावांचा तोटा आणि नेदरलँड्सला फायदा झाला.
श्रीलंकेला मोठा फटका
View this post on Instagram
नेदरलँड्स प्लेईंग ईलेव्हन | स्कॉट एडवर्ड्स (कॅप्टन आणि विकेटकीपर), विक्रमजीत सिंग, मॅक्स ओडोड, कॉलिन अकरमन, बास डी लीडे, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, तेजा निदामानुरु, लोगन व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन
श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | कुसल मेंडीस (कॅप्टन आणि विकेटकीपर) पथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस, सदीरा समरविक्रमा, चरित असलंका, धनंजया डी सिल्वा, दुशान हेमंथा, चमिका करुणारत्ने, महेश थेक्षाना, कसून रजिथा आणि दिलशान मधुशंका.