NED vs SL Live Streaming | श्रीलंका नेदरलँड्स विरुद्ध विजयाचं खातं उघडणार? सामना कधी-कुठे पाहता येणार?

Netherlands vs Sri Lanka Live Streaming | नेदरलँड्स दक्षिण आफ्रिकानंतर श्रीलंका विरुद्ध उलटफेर करण्यासाठी सज्ज आहे. तर श्रीलंका विजयी खातं उघडण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

NED vs SL Live Streaming | श्रीलंका नेदरलँड्स विरुद्ध विजयाचं खातं उघडणार? सामना कधी-कुठे पाहता येणार?
Follow us
| Updated on: Oct 20, 2023 | 11:09 PM

लखनऊ | नेदलँड्स क्रिकेट टीमने दक्षिण आफ्रिका टीमवर विजय मिळवला होता. नेदरलँड्सने 43 ओव्हरच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकावर 38 धावांनी मात करत उलटफेर केला होता. नेदरलँड्सने विजयासाठी दिलेल्या 246 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा बाजार 42.5 ओव्हरमध्ये 207 धावांवर आटोपला. नेदरलँड्सने यासह विजयाचं खातं उघडलं. आता नेदरलँड्सचा वर्ल्ड कपमधील चौथा सामना हा श्रीलंका विरुद्ध होणार आहे. श्रीलंकेचा वर्ल्ड कपमधील तिन्ही सामन्यात पराभव झाला. त्यामुळे शनिवारी होणाऱ्या सामन्यात नेदरलँड्स पुन्हा उलटफेर करते की श्रीलंका विजयाचं खातं उघडते याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. या सामन्याबाबत आपण जाणून घेऊयात.

नेदरलँड्स विरुद्ध श्रीलंका सामना केव्हा?

नेदरलँड्स विरुद्ध श्रीलंका सामना शनिवारी 21 ऑक्टोबर रोजी खेळवण्यात येणार आहे.

नेदरलँड्स विरुद्ध श्रीलंका सामना कुठे?

नेदरलँड्स विरुद्ध श्रीलंका सामन्याचं आयोजन हे लखनऊमधील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.

नेदरलँड्स विरुद्ध श्रीलंका सामन्याला किती वाजता सुरु होणार?

नेदरलँड्स विरुद्ध श्रीलंका सामन्याला सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 10 वाजता टॉस होईल.

नेदरलँड्स विरुद्ध श्रीलंका सामना टीव्हीवर कुठे पाहता येणार?

नेदरलँड्स विरुद्ध श्रीलंका सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.

नेदरलँड्स विरुद्ध श्रीलंका सामना मोबाईलवर फुकटात कुठे पाहता येईल?

नेदरलँड्स विरुद्ध श्रीलंका सामना फुकटात मोबाईलवर डिज्नी प्लस हॉटस्टारवर पाहता येईल.

नेदरलँड्स विरुद्ध श्रीलंका आमनेसामने

नेदरलँड्स क्रिकेट टीम | स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), मॅक्स ओ’डॉड, बास डी लीडे, विक्रम सिंग, तेजा निदामानुरु, पॉल व्हॅन मीकेरेन, कॉलिन अकरमन, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, रायन क्लेन, वेस्ली बॅरेसी, साकिब झुल्फिकार, शरीझ अहमद आणि सायब्रँड एंजेलब्रेक्ट.

श्रीलंका क्रिकेट टीम | कुसल मेंडिस (कॅप्टन), चमिका करुणारत्ने, कुसल परेरा, पथुम निसांका, लाहिरू कुमारा, दिमुथ करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, महेश तीक्षणा, दुनिथ वेललागे, कसून राजिथा, दुनिथ वेललागे, कासुन राजिथा, मथीशा पथिराणा, दिलशान मधुशंका आणि दुशन हेमंथा.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.