WTC Final : भारत-न्यूझीलंड अंतिम सामना तुझ्यासाठी कसा असेल? निल वॅगनरचं खास उत्तर

"वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात खेळायला मिळणं माझ्यासाठी मोठी संधी आहे. मला वाटत नाही की पुन्हा अशी संधी मिळेल. माझ्यावतीने आता माझं पूर्ण लक्ष आणि ताकद कसोटी क्रिकेटवर आहे, असं नील म्हणाला. (Neil Wagner Statement on WTC Final 2021)

WTC Final : भारत-न्यूझीलंड अंतिम सामना तुझ्यासाठी कसा असेल? निल वॅगनरचं खास उत्तर
WTC Final 2021
Follow us
| Updated on: May 30, 2021 | 2:24 PM

मुंबई : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना (WTC Final 2021) होणार आहे. येत्या 18 जून ते 23 जूनदरम्यान इंग्लंडमधील साऊथहॅम्प्टनमध्ये हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी न्यूझीलंडचा संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. तर भारतीय संघ येत्या 2 जून रोजी इंग्लंडसाठी टेकऑफ करेल. जगभरातील क्रिकेट रसिक प्रेक्षकांना या सामन्याची उत्सुकता लागून राहिली आहे. तशी उत्सुकता खेळाडूंना देखील लागून राहिली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघांची जोरदार तयारी सुरु आहे. अशातच न्यूझीलंडचा खेळाडू नील वॅगनर (Neil Wagner) याने अंतिम सामन्यासंबंधी मोठं वक्तव्य केलं आहे.  (Neil Wagner Statement on World test Champiopnship india vs New Zealand)

काय म्हणाला नील वॅनगर?

“वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना माझ्यासाठी विश्वचषक फायनलसारखा असेल कारण माझ्या देशाकडून मर्यादित ओव्हर्स खेळण्याची मला आणखी संधी मिळाली नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना ही माझ्यासाठी खूप मोठी संधी आहे. हा सामना माझ्यासाठी विश्वचषक फायनलहून कमी नसेल”, असं नील वॅगनर म्हणाला.

ESPN क्रिकइन्फोनुसार वॅनगर म्हणतो, “हा सामना माझ्यासाठी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासारखा असेल. माझी आतापर्यंतची एक खंत आहे की मला मर्यादित ओव्हर्सच्या सामन्यात आणखी माझ्या देशाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही.” एकदिवसीय आणि टी ट्वेन्टी सामन्यात नील वॅगनर आणखी न्यूझीलंड क्रिकेट संघाकडून खेळलेला नाही.

WTC चा अंतिम सामना खेळणं म्हणजे वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात खेळण्यासारखं!

“वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात खेळायला मिळणं माझ्यासाठी मोठी संधी आहे. मला वाटत नाही की पुन्हा अशी संधी मिळेल. माझ्यावतीने आता माझं पूर्ण लक्ष आणि ताकद कसोटी क्रिकेटवर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात खेळणं माझ्यासाठी वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात खेळण्यासारखं आहे.”

“मला माहित आहे की हा सामना उत्कंठावर्धक होणार आहे. सध्या भार जगातील सर्वोत्तम संघांपैकी एक आहे आणि त्यांच्याविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम कसोटी सामना खेळणं ही स्वतःला सिद्ध करण्याची एक चांगली संधी आहे. अंतिम सामन्यात खेळणं हे खरोखर रोमांचक असेल, परंतु हा फायनल सामना मी अतिशय लक्ष केंद्रित करुन खेळायचा ठरवलं आहे”, असंही तो म्हणाला.

(Neil Wagner Statement on World test Champiopnship india vs New Zealand)

हे ही वाचा :

कोणत्या बोलरला तू घाबरतो?, विराट कोहलीने सांगितलं दिग्गजाचं नाव

‘रात्र-रात्रभर झोप लागत नव्हती’, रवींद्र जाडेजाने शेअर केला ‘तो’ अनुभव

गुगलवर विराट कोहली काय सर्च करत असेल?, स्वत:च Google History शेअर केली, पाहा…

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.