IND vs SA : रोहित नहीं तो कुछ भी नहीं… विराटपासून पंतपर्यंत पराभवाची मालिका, रोहित शर्माशिवाय विजय अशक्य?
भारतीय संघा रोहित शर्मा नसल्यानं यंदा एकही सामना नाही जिंकू शकलाय.
नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेनं (SA) दुसऱ्या टी-20 सामन्यात चार विकेटनं भारतीय संघाला (IND) पराभूत करून 5 सामन्यात 2-0 असे पॉईंट्स नोंदवले आहे. ऋषभ पंत (Rishabh Pant) पुन्हा एकदा अपयशाचं तालिका तोडण्यात अपयशी राहिला आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) नसल्यानं यावर्षी सातव्यांदा भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतानं दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 149 धावांचं लक्ष्य दिलं होतं. ज्याला दक्षिण आफ्रिकेनं दहा चेंडूत पहिले सहा विकेटच्या नुकसानवर मिळवलं. पंतवर टीम इंडियाला पराभवाच्या छायेतून बाहेर काढण्याचीच जबाबदारी नव्हती तर रोहित शर्माशिवाय यावर्षी पहिल्यांदा भारताला विजय मिळवून देण्याचीही जबाबदारी होती. पण, तसं काही झालं नाही. पुन्हा एकदा भारताच्या पराभवात भरच पडली.
रोहित शर्मा नही तो कुछ भी नही
भारतीय संघा रोहित शर्मा नसल्यानं यंदा एकही सामना नाही जिंकू शकलाय. भारतामध्ये 2022मध्ये आतापर्यंत एकूण 18 सामने खेळवले गेले आहेत. यामध्ये रोहितनं आपल्या नेतृत्वाखाली अकरा सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे. तर दुसरीकडे उर्वरित 7 सामन्यात विराट कोहली, केएल राहुल आणि ऋषभ पंतनं भारती संघाचं नेतृ्त्व केलं. मात्र, सगळेच विजय मिळवून देण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. हिटमॅननं तीन वनडे, सहा टी-20 आणि दोन टेस्ट सामन्यात भारताला विजय मिळवून दिलाय. रोहितच्या नेतृत्वात भारतानं वेस्ट इंडिजविरोधात तीन टी-20 आणि तितकेच वनडे सामन्यात क्लीन स्वीप केलंय. तर श्रीलंकानं देखील तीन टी-20 आणि दोन कसोटी मालिकेत हरला आहे.
कोहली, राहुलनंतर पंत प्लॉप
कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताला दक्षिण आफ्रिकेविरोधात एक कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. तर दुसरीकडे केएल राहुलच्या नेतृत्वात भारताला दक्षिण आफ्रिकेविरोधात एक कसोटी सामना आणि तीन एकदिवसीय सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. कोहली आणि राहुलनंतर पंतला देखील दक्षिण आफ्रिकेविरोधात घरच्या सामन्यात सुरुवातीच्या दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. सामन्याचा विचार केल्यास भारतासाठी सर्वाधिक 40 धावा श्रेयस अय्यरनं काढल्या आहेत. त्याशिवाय दिनेश कार्तिकनं नाबाद 30 धावा केल्या आहेत. पंतला फक्त पाच धावाच करता आल्या. धावांचा पाठलाग करताना हेनरिक क्लासननं सर्वाधिक 81 धावा काढल्या. त्यानं 46 चेंडूत सातत चौकार आणि पाच सिक्सर मारले. कर्णधार टेंबा बावूमानं तीस चेंडूत 35 धावा केल्या आहेत.