Cricket: श्रीलंका दौऱ्यासाठी संघ जाहीर, रोहित कॅप्टन, तर अर्जुनला संधी
Cricket News: 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी 19 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित पौडेल हा श्रीलंकेविरुद्धच्या या मालिकेत नेपाळचं नेतृत्व करणार आहे.
पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश आणि इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडिया ही विश्रांतीवर आहे. चाहत्यांना टीम इंडियाच्या सामन्यांसाठी आणखी काही आठवडे वाट पाहावी लागणार आहे. टीम इंडिया मायदेशात बांगलादेश विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे भारतीय चाहत्यांना 19 दिवस आणखी वाट पाहावी लागणार आहे. अशात क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी नेपाळ क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. नेपाळ श्रीलंका दौऱ्यात एकूण 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. रोहित पौडेल नेपाळचं नेतृत्व करणार आहे. तर अर्जुन सौद यालाही संधी देण्यात आली आहे. तसेच संदीप लामिछाने याचाही समावेश करण्यात आला आहे. संदीपची काही दिवसांपूर्वी एका प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.
नेपाळ श्रीलंका डेव्हलपमेंट टीम विरुद्ध ही मालिका खेळणार आहे. नेपाळ क्रिकेट वर्ल्ड कप लीग 2 आधी ही मालिका खेळणार आहे. त्यामुळे नेपाळसाठी ही मालिका आगामी क्रिकेट वर्ल्ड कप लीग 2 स्पर्धेच्या हिशोबाने महत्त्वाची असणार आहे. उभयसंघातील या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना हा 3 सप्टेंबरला होणार आहे. तर 7 सप्टेंबरला अखेरचा सामना होणार आहे. तर दुसरा सामना हा 5 तारखेला पार पडेल. नेपाळ टीम या दरम्यान सराव सामनेही खेळणार असल्याची माहिती सोशल मीडियावरुन देण्यात आली आहे.
श्रीलंका दौऱ्यासाठी नेपाळ टीम
Happy Friday, #RhinoFans! 🏏
🇳🇵🦏 The Rhinos are heading to Sri Lanka for a thrilling 3-match ODI series against the Sri Lanka Development Squad as we prepare for the ICC CWC League 2! 🌟 Let’s roar our support and back our team! 🙌
Cricket Association of Nepal (CAN) extends… pic.twitter.com/TaI5HE9Ebh
— CAN (@CricketNep) August 30, 2024
नेपाळ टीमचा कॅनडा दौरा
दरम्यान नेपाळ त्यानंतर कॅनडा दौऱ्यावर जाणार आहे. कॅनडा दौऱ्यात नेपाळ, ओमान आणि यजमान यांच्यात ही तिरंगी मालिका होणार आहे. या तिन्ही संघात फेब्रुवारी महिन्यात नेपाळमध्ये स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. नेपाळला तेव्हा 3 सामन्यात पराभूत व्हावं लागलं होतं. तर नेदरलँड्स आणि नामिबियाला पराभूत केलं होतं.
श्रीलंका दौऱ्यासाठी नेपाळ क्रिकेट टीम : रोहित पौडेल (कर्णधार), आसिफ शेख, कुशल भुर्तेल, सोमपाल कामी, ललित राजबंशी, देव खनाल, आरिफ शेख, करण केसी, गुलशन झा, दीपेंद्र सिंग आयरी, अनिल साह, भीम शार्की, कुशल मल्ला, आकाश चंद, रिजन ढकल, संदीप जोरा, अर्जुन सौद, सागर ढकल आणि संदीप लामिछाने.