Asia Cup 2023 | एशिया कपसाठी टीम जाहीर, रोहितकडे कॅप्टन्सी
Asia Cup 2023 | क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान आणि बांगलादेशनंतर अखेर 17 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. रोहितकडे टीमच्या कर्णधारपदाती जबाबदारी देण्यात आली आहे.
मुंबई | टीम इंडियाने वेस्ट इंडिज दौऱ्यात शानदार कामगिरी केली. विंडिज दौऱ्यात कसोटी आणि त्यांनतर एकदिवसीय मालिका जिंकली. मात्र टीम इंडियाला टी 20 मालिकेत अपयश आलं. सलग 2 सामने गमावल्यानंतर टीम इंडिया मालिकेत 0-2 अशा फरकाने मागे पडली. मात्र त्यानंतर टीम इंडियाने सलग 2 सामने जिंकून मालिकेत बरोबरी साधली. त्यामुळे 4 सामन्यानंतर 5 सामन्यांची मालिका 2-2 ने बरोबरीत आली.
पाचवा आणि अंतिम सामना 13 ऑगस्ट रोजी पार पडला. पाचव्या सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियाने विंडिजला विजयासाठी 166 रन्सचं टार्गेट ठेवलं. ब्रँडन किंग आणि निकोलस पूरन यांच्या जोरदार खेळीच्या जोरावर विंडिजने हे टार्गेट 18 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून पू्र्ण केलं. विंडिजने अशाप्रकारे सामन्यासह 3-2 मालिका जिंकली. विंडिज टीम इंडिया विरुद्ध 2016 नंतर पहिल्यांदा यशस्वी ठरली.
आता या विंडिज दौऱ्यानंतर टीम इंडिया आशिया कप 2023 कडे पूर्णपणे लक्ष देणार आहे. आशिया कपसाठी टीम इंडिया सराव करणार आहे. आशिया कप स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. आशिया कपसाठी पाकिस्तान आणि बांगलादेशने संघ जाहीर केलाय. बाबर आझम पाकिस्तानचं नेतृत्व करणार आहे. तर बांगलादेशचं कर्णधारपद शाकिब अल हसन याला देण्यात आलं आहे.
आशिया कप 2023 साठी नेपाळ संघ
The Cricket Association of Nepal (CAN) has announced the final squad for the upcoming Asia Cup 2023.
The Nepal team will go through a week-long preparation camp in Pakistan, where the team will train and play matches against PCB-designated teams. pic.twitter.com/yWt4ZDyogx
— CAN (@CricketNep) August 14, 2023
पाकिस्तान, बांगलादेशनंतर आता टीमने आशिया कपसाठी संघ जाहीर केला आहे. रोहितकडे संघाची सर्व सूत्रं देण्यात आली आहेत. नेपाळ क्रिकेट बोर्डाने 17 सदस्यीय संघ जाहीर केलाय. रोहित पौडेल याला कॅप्टन्सी दिली गेली आहे.
एशिया कप 2023 साठी नेपाळ क्रिकेट टीम
रोहित पौडेल (कॅप्टन), आसिफ शेख, कुशल भुर्टेल, ललित राजबंशी, भीम सार्की, कुशल मल्ला, दीपेंद्र सिंह ऐरी, संदीप लामिछाने, करण केसी, गुलशन झा, सोमपाल कामी, आरिफ शेख, प्रतीस जीसी, किशोर महतो, संदीप जोरा, अर्जुन सऊद आणि श्याम ढकाल.