World Cup 2023 Points Table : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत आणखी एक धक्कादायक निकाल, नेदरलँडच्या दणक्याने भारताला फायदा

World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत आणखी एक धक्कादायक निकालाची नोंद झाली आहे. दुबळ्या समजल्या जाणाऱ्या नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेला दणका दिला आहे. त्यामुळे गुणतालिकेत मोठा उलटफेर झाला आहे.

World Cup 2023 Points Table : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत आणखी एक धक्कादायक निकाल, नेदरलँडच्या दणक्याने भारताला फायदा
World Cup 2023 Points Table : नेदरलँडचा दक्षिण आफ्रिकेला दे धक्का, फायदा मात्र टीम इंडियाचा! कसं ते जाणून घ्याImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Oct 17, 2023 | 11:49 PM

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत नेदरलँडने बलाढ्य अशा दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे. या पराभवामुळे क्रीडा जगतात खळबळ उडाली आहे. सुरुवातीच्या दोन सामन्यात जबरदस्त कामगिरी केलेल्या दक्षिण आफ्रिका संघाने नेदरलँडसमोर अक्षरश: नांगी टाकली. नाणेफेकीचा कौल जिंकत दक्षिण आफ्रिकेने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. कारण पावसाचं चिन्ह आणि वातावरण पाहता दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा याने निर्णय घेतला. पण हा निर्णय अंगाशी आला असंच म्हणावं लागेल. 43 षटकांच्या सामन्यात नेदरलँडने 8 गडी गमवून 245 धावा केल्या आणि विजयासाठी 246 धावांचं आव्हान दिलं. विजयी धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव गडगडला. संपूर्ण संघ अवघ्या 207 धावांवर बाद झाला. दक्षिण आफ्रिकेच्या पराभवामुळे गुणतालिकेत मोठा फरक पडला आहे. खासकरून टीम इंडियाला फायदा झाला आहे.

दक्षिण आफ्रिकेने नेदरलँड विरुद्धचा सामना गमवल्याने टीम इंडियाच अव्वल स्थान कायम आहे. हा सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला असता तर अव्वल स्थानी पोहोचला असता. पण पराभवामुळे गुणतालिकेत मोठा बदल झाल्याचं पाहायला. तळाशी असलेल्या नेदरलँडचा संघ नवव्या स्थानावर पोहोचला आहे. त्यामुळे श्रीलंकेला फटका बसला आहे. तर न्यूझीलंड आणि पाकिस्तानला फायदा झाला असून दुसरं आणि तिसरं स्थान कायम आहे.

संघ सामने विजय पराभव गुणनेट रनरेट
भारत77014+2.102
दक्षिण अफ्रिका76112+2.290
ऑस्ट्रेलिया75210+0.924
न्यूझीलंड8448+0.398
पाकिस्तान8448+0.036
अफगाणिस्तान7438-0.330
श्रीलंका 7254-1.162
नेदरलँड्स7254-1.398
बांगलादेश7162-1.446
इंग्लंड7162-1.504

दक्षिण आफ्रिका नेदरलँड विरुद्धचा सामना सहज जिंकेल असं सर्वांना वाटलं होतं. मात्र अफगाणिस्ताननंतर नेदरलँडने स्पर्धेत चमत्कार केला आहे. अफगाणिस्ताने दोन दिवसांपूर्वी बलाढ्य इंग्लंडचा पराभव केला होता. त्यानंतर आता नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे. सोपा वाटणारा संघ किती कठीण लढत देऊ शकतो, हे उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे कोणत्याही संघाला कमी लेखून चालणार नाही.

दोन्ही संघांचे खेळाडू

नेदरलँड्स (प्लेइंग इलेव्हन): विक्रमजीत सिंग, मॅक्स ओडोड, कॉलिन अकरमन, बास डी लीडे, तेजा निदामानुरु, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार/विकेटकीपर), सायब्रँड एंजेलब्रेक्ट, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन.

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेंबा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, कागिसो रबाडा, केशव महाराज, लुंगी एनगिडी, जेराल्ड कोएत्झी.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.