NED vs AFG Toss | नेदरलँड्सने अफगाणिस्तान विरुद्ध टॉस जिंकला, बॅटिंगचा निर्णय
Netherlands vs Afghanistan Toss | नेदरलँड्स आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांसाठी वर्ल्ड कपमधील हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे या सामन्यात चांगलीच चुरस आणि चढाओढ पाहायला मिळणार आहे.
लखनऊ | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 34 व्या सामन्यात नेदरलँड्स विरुद्ध अफगाणिस्तान आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे लखनऊमधील अटलबिहारी वाजपेयी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस करण्यात आला. नेदरलँड्सच्या बाजूने नाणेफेकीचा कौल गेला. नेदरलँड्स कॅप्टन स्कॉट एडवर्ड्स याने पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांनी प्लेईंग ईलेव्हनमध्ये बदल केलाय.
दोन्ही संघात बदल
नेदरलँड्स आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांनी या सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत. नेदरलँड्सने 2 तर अफगाणिस्तानने 1 बदल केलाय. अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हनमध्ये नवीन उल हक याच्या जागी नूर अहमद याची एन्ट्री झाली आहे. नूरने पाकिस्तान विरुद्ध 3 विकेट्स घेतल्या होत्या. अफगाणिस्तान 4 स्पिनरसोबत खेळणार आहे. तर नेदरलँड्स टीममध्ये साकिब झुल्फिकार आणि व्हॅन डर मर्वे यांचा समावेश केला गेला आहे. त्यामुळे नेदरलँड्सची गोलंदाजी आणखी मजबूत झाली आहे.
हेड टु हेड रेकॉर्ड्स
आतापर्यंत नेदरलँड्स विरुद्ध अफगाणिस्तान वनडे क्रिकेटमध्ये एकूण 9 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये 9 सामन्यात अफगाणिस्तानने नेदरलँड्सवर एकतर्फी मात केलीय. अफगाणिस्ताननने नेदरलँड्सला 9 पैकी एकूण 7 वेळा पराभूत केलंय. तर नेदरलँड्सनेही 2 सामन्यात विजय मिळवलाय. मात्र हे दोन्ही संघ यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये वेगळ्याच रुपात दिसत आहेत. त्यामुळे या आकड्यावरुन दोघांपैकी कुणालाही कमजोर ठरवू शकत नाही.
नेदरलँड्स टॉसचा बॉस
🚨 TOSS NEWS 🚨
The Netherlands have won the toss and opted to bat first. 👍
Let’s do this Atalano! 🤩#AfghanAtalan | #CWC23 | #AFGvNED | #WarzaMaidanGata pic.twitter.com/XHroPy9H3X
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) November 3, 2023
नेदरलँड्स प्लेईंग ईलेव्हन | स्कॉट एडवर्ड्स (कॅप्टन आणि विकेटकीपर), वेस्ली बॅरेसी, मॅक्स ओडॉड, कॉलिन अकरमन, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, बास डी लीडे, साकिब झुल्फिकार, लोगन व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त आणि पॉल व्हॅन मीकरेन.
अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, रहमत शाह, अजमतुल्ला ओमरझाई, इक्रम अलीखिल (विकेटकीपर), मोहम्मद नबी, रशीद खान, मुजीब उर रहमान, फजलहक फारुकी आणि नूर अहमद.