SL vs IND: गोलंदाजांवर ‘गंभीर’ इफेक्ट, रिंकू-सूर्यकुमार जोडीने बॉलिंगने मॅच जिंकवली

Gautam Gambhir SL vs IND 3rd T20i: सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंह या दोघांनी श्रीलंके विरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी20i सामन्यात आपल्या बॉलिंगची धार दाखवून दिली.

SL vs IND: गोलंदाजांवर 'गंभीर' इफेक्ट, रिंकू-सूर्यकुमार जोडीने बॉलिंगने मॅच जिंकवली
gautam gambhir and suryakumar yadavImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Jul 31, 2024 | 8:17 PM

टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात श्रीलंकेविरुद्ध टी 20 मालिकेत 3-0 अशा एकतर्फी फरकाने विजय मिळवला. सूर्यकुमार यादव-गौतम गंभीर या दोघांनी कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक म्हणून पहिल्याच आंतरराष्ट्रीय मालिकेत भारताला जिंकवून नव्या प्रवासाची शानदार सुरुवात केली. गौतम गंभीरने मेंटॉर म्हणून आयपीएलमध्ये केलेले प्रयोग यशस्वी ठरले. त्यानंतर गंभीरला टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची धुरा हाती घेतल्यानंतर केलेल्या प्रयोगातही यश मिळालं आहे. सूर्यकुमार-रिंकू या दोघांनी लंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी20i सामन्यात चक्क बॉलिंगच्या जोरावर विजयी केलं. रिंकू-सूर्या या जोडीने शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 8 धावा देऊन 4 विकेट्स घेत गमावलेला सामना बरोबरीत सोडवण्यात यश मिळवलं. त्यानंतर टीम इंडियाने हा सामना सुपर ओव्हरमध्ये जिंकला. त्यानंतर गौतम गंभीरची सोशल मीडियावर एकच चर्चा पाहायला मिळत आहे.

टीम इंडियाने तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात सुवर ओव्हरमध्ये शानदार विजय मिळवला. टीम इंडियाने 137 धावा केल्या. श्रीलंकेला प्रत्युत्तरात 8 विकेट्स गमावून 137 धावाच करता आल्या. श्रीलंकेच्या डावातील 19 वी ओव्हर रिंकूने टाकली. रिंकूने 3 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. तर सूर्यकुमारने 20 वी ओव्हर टाकली. सूर्याने या ओव्हरमध्ये 5 धावा देत 2 विकेट्स घेतल्या.

रिंकू आणि सूर्या दोघांच्या बॉलिंगनंतर गौतम गंभीरसाठी सोशल मीडियावर मिम्स व्हायरल झाले आहेत. नेटकऱ्यांनी गंभीरचं तोंडभरून कौतुक केलं आहे. श्रीलंका विजयाच्या उंबरठ्यावर होती. भारताच्या विजयाची शक्यता ही फक्त 1 टक्का इतकीच होती. मात्र या जोडीने केलेल्या चिवट बॉलिंगमुळे सामना बरोबरीत सुटला. त्यानंतर भारताने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला.

गौतम गंभीर आर्टिस्ट, सोशल मीडियावर मीम्स व्हायरल

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज आणि खलील अहमद.

श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : चरित असलंका (कॅप्टन), पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चामिंडू विक्रमसिंघे, वानिंदू हसरंगा, रमेश मेंडिस, महीश तीक्षाना, मथीशा पाथिराना आणि असिथा फर्नांडो.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.