Ajinkya Rahane | अजिंक्य रहाणे याला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उर्वरित कसोटी सामन्यांमध्ये संधी?

अजिंक्यने एकूण 82 कसोटी सामन्यात टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. अंजिक्यने 140 डावांमध्ये 12 शतकं आणि 25 अर्धशतकांच्या मदतीने 4 हजार 931 धावा केल्या आहेत.

Ajinkya Rahane | अजिंक्य रहाणे याला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उर्वरित कसोटी सामन्यांमध्ये संधी?
Follow us
| Updated on: Feb 19, 2023 | 3:59 PM

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियावर दुसऱ्या कसोटी सामन्यात 6 विकेट्सने शानदार विजय मिळवला. विशेष म्हणजे टीम इंडियाने या मालिकेत सलग दुसऱ्या सामन्यात कांगारुंचा तिसऱ्याच दिवशी पराभव केला. टीम इंडियाने या विजयासह 4 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. टीम इंडियाची फिरकी जोडी आर अश्विन आणि रविंद्र जडेजा या दोघांनी टीम इंडियाचा विजय सोपा केला. एका बाजूला फिरकी खेळाडू मॅचविनिंग खेळी करतायेत. तर दुसऱ्या बाजूला एक खेळाडू हा टीम इंडियासाठी व्हिलन ठरतोय.

केएल राहुल सातत्याने धावा करण्यात अपयशी ठरतोय. केएलच्या या अपयशी खेळीमुळे त्याच्या जागी मालिकेतील उर्वरित 2 सामन्यांसाठी अजिंक्य रहाणे याचा समावेश करावा, अशी मागणी आता सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे.

केएल दुसऱ्या टेस्टमध्येही फ्लॉप ठरला. केएलने पहिल्या डावात 17 तर दुसऱ्या डावात फक्त 1 धावच केली. केएलने गेल्या 10 टेस्ट इनिंग्समध्ये एकदाही 25 रन्स करु शकलेला नाही. केएलने गेल्या 10 डावांमध्ये फक्त 125 धावा केल्या आहेत. केएलचा यात 23 हा बेस्ट स्कोअर आहे.

हे सुद्धा वाचा

रहाणेसाठी नेटकरी आग्रही

दरम्यान आता रहाणेसाठी सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी लढा उभारला आहे. रहाणे एकवेळ टीम इंडियाचा कर्णधार राहिला आहे. मात्र तो गेल्या 1 वर्षापासून टीममधून बाहेर आहे. तर दुसऱ्या बाजूला केएल वारंवार संधी मिळूनही तो फ्लॉप ठरतोय.

बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या 2 कसोटींसाठीच भारतीय संघ जाहीर केला होता. आता उर्वरित 2 सामन्यांसाठी अजिंक्यचा समावेश करावा, अशी मागणी नेटकऱ्यांची आहे.

अजिंक्यच्या नेतृत्वात टीम इंडियाने आतापर्यंत एकही कसोटी सामना गमावलेला नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाने अजिंक्यच्या कॅप्टन्सीतच बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकली होती. जेव्हा अजिंक्यला कर्णधारपदाची सूत्रं दिली तेव्हा टीम इंडिया त्या मालिकेत पिछाडीवर होती. मात्र रहाणेने युवा खेळाडूंना विश्वासात घेत सीरिज जिंकण्याची किमया करुन दाखवली होती.

टीम इंडियाने गाबामध्ये ऑस्ट्रेलियाची जिरवली होती. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात टीम इंडियाने पाणी पाजलं होतं. फूल टाईम कॅप्टन विराट कोहली मालिकेतील पहिल्या सामन्यातील पराभवानंतर वैयक्तिक कारणामुळे भारतात परतला. तेव्हा रहाणेकडे सूत्र आली. पण रहाणेने ती जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली.

मात्र तेव्हापासून रहाणेला सातत्याने संधी मिळालेली नाही. यामुळे आता रहाणेला संधी द्यावी अशी मागणी नेटकऱ्यांची आहे. बीसीसीआय लवकरच उर्विरत 2 सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर करणार आहे. त्यामुळे बीसीसीआय रहाणेच्या नावाचा विचार करते का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

अजिंक्यची कसोटी कारकीर्द

अजिंक्यने एकूण 82 कसोटी सामन्यात टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. अंजिक्यने 140 डावांमध्ये 12 शतकं आणि 25 अर्धशतकांच्या मदतीने 4 हजार 931 धावा केल्या आहेत.

अजिंक्यची कर्णधार म्हणून आकडेवारी

अजिंक्यने त्याच्या कसोटी कारकीर्दीत एकूण 6 सामन्यांमध्ये कॅप्टन्सी केलीय. उल्लेखनीय बाब अशी की टीम इंडियाचा 6 पैकी एकाही सामन्यात पराभव झालेला नाही. अजिंक्यने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला 4 सामन्यात विजय मिळवून दिलाय. तर 2 सामने ड्रॉ राहिले आहेत. विशेष म्हणजे यातील 6 पैकी 4 सामने हे बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील आहेत. ज्यातील 3 सामन्यात भारताचा विजय झाला होता.

दरम्यान बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील तिसरा कसोटी सामना हा 1 ते 5 मार्च दरम्यान इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.