Virat Kohli Selfish | विराट कोहली स्वार्थी, नेटकऱ्यांची क्रिकेटरवर जोरदार टीका
Virat Kohli India vs Bangladesh | क्रिकेटमध्ये आतापर्यंत विराट कोहली याच्यासारखा स्वार्थी खेळाडू पाहिला नाही, अशा शब्दात विराटवर जोरदार आणि सडकून टीका केली जात आहे. विराटला ट्रोल केलं जात आहे.
पुणे | विराट कोहली याने बांगलादेश विरुद्ध एका दगडात 2 पक्षी मारले.विराटने सिक्स ठोकून शतक पूर्ण केलं. तसेच टीम इंडियाला 7 विकेट्सने विजयी केलं. विराटने 97 बॉलमध्ये 6 चौकार आणि 4 सिक्सच्या मदतीने नाबाद 103 धावांची शतकी खेळी केली. विराटच्या वनडे कारकीर्दीतील हे 48 वं शतक ठरलं. विराटच्या या शतकाच्या जोरावर टीम इंडियाने 41.3 ओव्हरमध्ये 3 विकेट्सच्या मोबदल्यात 257 धावांचं आव्हान पूर्ण केलं. टीम इंडियाचा हा वर्ल्ड कप 2023 मधील सलग आणि एकूण चौथा विजय ठरला. विराटने टीम इंडियाच्या विजयात निर्णायक आणि मोठी भूमिका बजावली. मात्र त्यानंतरही विराटला नेटकऱ्यांनी फैलावर घेतलं आहे.
नेटकऱ्यांनी विराटवर जोरदार टीका केलीय. विराट टीमसाठी नाही, तर स्वत:साठी खेळतो, असं नेटकरी म्हणतायेत. विराटने शतक करण्यासाठी काही बॉलवर रन्स मिळूनही घेतल्या नाहीत. त्याने शतकासाठी खेळ लांबवला. दुसऱ्या बाजूने केएल राहुल याने विराटला शतक करण्यासाठी पूर्णपणे मदत करत चांगली साथ दिली. मात्र विराटने वैयक्तिक शतकासाठी टीम इंडियाचा विजय खेचणं भारतीय क्रिकेट चाहत्यांना आणि नेटकऱ्यांना आवडलेलं नाही. विराटला सोशल मीडियावर सेल्फिश म्हटलं जात आहे. ट्विटरवर Selfish असा हॅशटॅग ट्रेंड झाला आहे. या हॅशटॅगसह हजारो ट्विट करण्यात आले आहेत. कुणी विराटवर टीका करतंय तर कुणी मागचेपुढचे संदर्भ देत आहेत.
नेटकऱ्यांच्या विराटवर निशाणा
Never saw someone Playing for selfish century in ICC Tournament, One puts his heart out for Country & this shameless man playing for himself in front of whole world.
Virat Kohli you lost my whole respect.💔#ShameOnKohli #indiavsbangladesh pic.twitter.com/s2NQs6PVnO
— ᴘʀᴀᴛʜᴍᴇsʜ⁴⁵ (@45Fan_Prathmesh) October 19, 2023
विराटचं चुकलं का?
CRICKET HAS NEVER SEEN A MORE SELFISH PLAYER THAN HIM pic.twitter.com/QqLKhN8IFL
— ` (@kurkureter) October 19, 2023
विराटच्या वेगवान 26 हजार आंतरराष्ट्रीय धावा
दरम्यान विराटने या शतका दरम्यान मोठा विक्रम आपल्या नावावर केला. विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमी डावांमध्ये 26 हजार धावा करणारा पहिला फलंदाज ठरला. विराटने याबाबतीत सचिन तेंडुलकरला मागे टाकलं. विराटने 567 डावांमध्ये 26 हजार धावा पूर्ण केल्या. तर सचिनने 600 डावांमध्ये ही कामगिरी केली होती.
बांगलादेश प्लेईंग ईलेव्हन | नजमुल हुसैन शांतो (कॅप्टन), लिटॉन दास, तंझिद हसन, मेहदी हसन मिराज, तौहीद हृदोय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्ला, नसुम अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान आणि शरीफुल इस्लाम.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.