Team India: Bcci सचिव जय शाह यांची भारतीय खेळाडूंसाठी मोठी घोषणा, क्रिकेटपटूंना फायदा

Bcci Jay Shah Team India: टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर असताना बीसीसआय सचिव जय शाह यांनी मोठी घोषणा केली आहे. जय शाह यांनी सोशल मीडियावरुन मोठी घोषणा केली आहे.

Team India: Bcci सचिव जय शाह यांची भारतीय खेळाडूंसाठी मोठी घोषणा, क्रिकेटपटूंना फायदा
bcci secretary jay shah and rohit sharmaImage Credit source: bcci
Follow us
| Updated on: Aug 03, 2024 | 8:59 PM

टीम इंडिया सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टी 20i मालिकेत श्रीलंकेचा 3-0 ने धुव्वा उडवला. त्यानंतर आता रोहित शर्मा याच्या नेतृत्वात श्रीलंकेविरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. अशात भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी शनिवारी 3 ऑगस्ट रोजी मोठी घोषणा केली आहे. जय शाह यांच्या या घोषणेमुळे भारतीय खेळाडूंना तगडा फायदा होणार आहे. जय शाह यांनी सोशल मीडियावरुन या निर्णयाची माहिती दिली आहे.

भारतीय खेळाडूंसाठी नव्या एनसीए अर्थात राष्ट्रीय क्रिकेट अकादमीबाबत माहिती दिली आहे. काही वर्षांपूर्वी बंगळुरुत एनसीएची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर आता या एनसीएत आधुनिक आणि जागतिक दर्जाच्या सुविधा असणार आहेत. ज्यामुळे भारतीय खेळाडूंना सरावात कोणताही अडथळा येणार नाही. तसेच आणखी चांगल्याप्रकारे सराव करता येणार आहे. इतकंच नाही आता पावसामुळे सरावात खंड पडणार नाही. टीम इंडियाचे आणि देशांतर्गत क्रिकेट खेळणारे खेळाडू दुखापतीनंतर इथे याच एनसीएत आपल्या फिटनेसवर मेहनत घेतात.

3 नवे ग्राउंड, ऑलिम्पिक दर्जाचं स्विमिंग पूल..

जय शाह यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये एनसीएचे 4 फोटो पोस्ट केले आहेत. त्यापैकी एका फोटोत सरावासाठी मैदान पाहायला मिळत आहे. दुसऱ्या फोटोत बंदिस्त स्वरुपाच्या (इनडोर) सरावासाठीचा एक फोटो शेअर केला आहे. तिसऱ्या फोटोत सरावासाठीची खेळपट्टी आणि फिल्डिंगसाठीचा भाग पाहायला मिळत आहे. तसेच ड्रोन शॉटद्वारे या एनसीएची झलक दाखवली आहे. या एनसीएतील काम आता अखेरच्या टप्प्यात आहे.

बीसीसीआयची सध्याची राष्ट्रीय क्रिकेट अकादमी ही बंगळुरुतील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आहे. त्यामुळे एकाच वेळेस सामना आणि सराव अशा दोन्ही गोष्टी शक्य होत नाहीत. त्यामुळे या स्टेडियमपासूनच हाकेच्या अंतरावर नव्या अकादमीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यानंतर आता हे सारे प्रयत्न प्रत्यक्ष पाहायला मिळत आहे.

जय शाह यांनी काय म्हटलं?

“बीसीसीआयच्या नव्या एनसीएचं काम जवळपास पूर्ण झाल्याचं जाहीर करताना मला आनंद आहे. या नव्या एनसीएत 3 विश्वस्तरीय ग्राउंड, सरावासाठी 45 खेळपट्ट्या, इनडोअर खेळपट्ट्या, ऑलिम्पिक दर्जाचं स्विमिंग पूल, आधूनिक ट्रेनिंग सेटर, स्पोर्ट्स सायन्स संदर्भात सर्व सुविधा उपल्बध असणार आहेत. या नव्या एनसीएमुळे विद्यमान आणि नव्या पिढीतील क्रिकेटपटूंच्या कामगिरीत सुधारणा होण्यात मदत होईल “, असा विश्वास जय शाह यांनी व्यक्त केला आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.