NZ vs PAK: पाकिस्तानविरोधातील टी 20 मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा, ‘या’ दिग्गज खेळाडूंचं पुनरागमन

एकूण 3 सामन्यांची ही टी 20 मालिका असणार आहे.

NZ vs PAK: पाकिस्तानविरोधातील टी 20 मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा, 'या' दिग्गज खेळाडूंचं पुनरागमन
Follow us
| Updated on: Dec 12, 2020 | 7:04 PM

ऑकलॅंड : पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात टी 20 मालिका (NZ vs PAK T 20 Series) खेळण्यात येणार आहे. ही टी 20 मालिका 3 सामन्यांची असणार आहे. या मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा करण्यात आली आहे. संघात कर्णधार केन विल्यम्सन (Kane Williamson) आणि ट्रेन्ट बोल्टचं (Trent Boult) पुनरागन झालं आहे. हे दोन्ही खेळाडू दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात खेळणार आहेत. तर अनुभवी रॉस टेलरला वगळण्यात आलं आहे. तसेच या मालिकेसाठी काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. ग्लेन फिलिप्स आणि डेवन कॉन्वे या नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. New Zealand announced squad for T20 series against Pakistan

मिचेल सॅंटनर या मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचे नेतृत्व करणार आहे. तर त्यानंतरच्या उर्वरित 2 सामन्यांमध्ये केन विल्यम्सन कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे.

विलियम्सन, बोल्ट, टीम साउथी, काइले जेमिसन आणि डार्ली मिचेल हे दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात खेळणार आहेत. केन विल्यम्सनची पत्नी गरोदर आहे. केन लवकरच बाबा होणार आहे. यामुळे केनने पितृत्वाची रजा घेतली आहे. या कारणामुळे केन वेस्ट इंडिजविरोधातील दुसऱ्या कसोटी सामन्यातही खेळत नाही आहे. केन लवकरच परतणार आहे. केन परतल्यानंतर पाकिस्तानविरोधातील शेवटच्या 2 टी 20 सामन्यात संघाचे नेतृत्व करणार आहे.

“वेलिंग्टनमध्ये न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी सामना खेळण्यात येत आहे. या सामन्यानंतर 3 दिवसांनी या टी 20 मालिकेला सुरुवात होईल”, अशी माहिती न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने दिली. सध्या वेस्ट इंडिजचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात सध्या कसोटी मालिका खेळण्यात येत आहे. या कसोटी मालिकेआधी उभय संघात 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळण्यात आली. यामध्ये न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव केला. तर तिसरा टी 20 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.

टी 20 मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना – 18 डिसेंबर

दुसरा सामना – 20 डिसेंबर

तिसरा सामना – 22 डिसेंबर

पहिल्या टी 20 सामन्यासाठी न्यूझीलंड टीम : मिचेल सँटनर (कर्णधार), टॉड एस्ले, डग ब्रेसवेल, मार्क चॅपमॅन, डेवन कॉन्वे, जॅकब डफी, मार्टिन गुप्टील, स्कॉट कुगलेजिन, जिम्मी निशाम, ग्लेन फिलिप्स, टीम सायफर्ट (विकेटकीपर), ईश सोढी आणि ब्लेयर टिकनेर.

दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यासाठी न्यूझीलंड संघ : केन विल्यम्सन (कर्णधार), टॉड एस्ले, ट्रेन्ट बोल्ट, डेवन कॉन्वे, मार्टिन गुप्टील, काइल जेमिसन, स्कॉट कुगलेजिन, डार्ली मिशेल, जिम्मी निशम, ग्लेन फिलिप्स, टीम सेइफर्ट (विकेटकीपर), ईश सोढी आणि टीम साउथी.

संबंधित बातम्या :

Pakistan Tour New Zealand | पाकिस्तानच्या खेळाडूंकडून कोरोना नियमांचं उल्लंघन, न्यूझीलंडच्या अधिकाऱ्यांचा पारा चढला

New Zealand announced squad for T20 series against Pakistan

'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.