Cricket: 3 टेस्ट, 6 वनडे आणि 8 टी20i सामन्याचं वेळापत्रक जाहीर, कॅप्टनबाबत निर्णय काय?

Cricket: क्रिकेट बोर्डाने आगामी 2024-25 या कालावधीसाठी मायदेशातील मालिकांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.

Cricket: 3 टेस्ट, 6 वनडे आणि 8 टी20i सामन्याचं वेळापत्रक जाहीर, कॅप्टनबाबत निर्णय काय?
kane williamson and rohit sharma
Follow us
| Updated on: Jul 17, 2024 | 8:42 PM

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने 2024-2025 साठी मायदेशातील मालिकेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार एकूण 3 संघ न्यूझीलंड दौरा करणार आहेत. न्यूझीलंड मायदेशात इंग्लंड, श्रीलंका आणि पाकिस्तान विरुद्ध भिडणार आहे. त्यानुसार न्यूझीलंड एकूण 3 संघांविरुद्ध विविध 5 मालिकांमध्ये 17 सामने खेळणार आहे. न्यूझीलंड या वर्षभरात 3 कसोटी, 6 एकदिवसीय आणि 8 टी20i सामने खेळणार आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

न्यूझीलंड सर्वात आधी इंग्लंड विरुद्ध भिडणार आहे. इंग्लंड न्यूझीलंड दौऱ्यात एकूण 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या टेस्ट सीरिजची सुरुवात 28 नोव्हेंबरपासून ख्राइस्टचर्च इथून होईल. त्यानंतर उर्वरित 2 सामने हे वेलिंग्टन आणि हेमिल्टन येथे होणार आहेत. त्यानंतर श्रीलंका न्यूझीलंड दौऱ्यात टी20i आणि वनडे सीरिज खेळणार आहे. दोन्ही मालिकेत प्रत्येकी 3-3 सामने खेळवण्यात येणार आहेत.

त्यानतंर न्यूझीलंड पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. दोन्ही संघांसाठी आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या हिशोबाने ही ट्राय सीरिज निर्णायक असणार आहे. चॅम्पिन्स ट्रॉफीनंतर पाकिस्तान न्यूझीलंड दौरा करणार आहे. पाकिस्तान न्यूझीलंड विरुद्ध टी 20i आणि वनडे सीरिज खेळणार आहे. उभयसंघात एकूण 5 टी20i आणि 3 वनडे मॅचेस होणार आहेत. पाकिस्तानच्या न्यूझीलंड दौऱ्याची सुरुवात ही 16 मार्चपासून होणार आहे.

न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका

पहिला सामना, 28 नोव्हेंबर-2 डिसेंबर, ख्राईस्टचर्च दुसरा सामना, 6 ते 10 डिसेंबर, वेलिंग्टन. तिसरा सामना, 14 ते 18 डिसेंबर, हॅमिल्टन.

श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड वनडे आणि टी 20i सीरिज वेळापत्रक

टी 20 मालिका

पहिला सामना, 28 डिसेंबर, तौरंगा दुसरा सामना, 30 डिसेंबर, तौरंगा तिसरा सामना, 2 जानेवारी, नेल्सन

वनडे सीरिज

पहिला सामना, 5 जानेवारी, वेलिंग्टन दुसरा सामना, 8 जानेवारी, हॅमिल्टन तिसरा सामना, 11 जानेवारी,ऑकलँड

पाकिस्तान विरुद्ध टी 20 मालिका

पहिला सामना, 16 मार्च, ख्राईस्टचर्च दुसरा सामना, 18 मार्च, डुनेडिन तिसरा सामना, 21 मार्च, ऑकलँड चौथा सामना, 23 मार्च, टॉरंगा पाचवा सामना, 26 मार्च, वेलिंग्टन

न्यूझीलंडचं होम शेड्यूल

पाकिस्तान विरुद्ध एकदिवसीय मालिका

पहिला सामना, 29 मार्च, नेपियर दुसरा सामना, 2 एप्रिल, हॅमिल्टन तिसरा सामना, 5 एप्रिल, टॉरंगा

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.