Retirement: नोकरीसाठी क्रिकेटचा त्याग, 30 शतकांसह 16 हजार धावा करणाऱ्या ‘वर्कर’चा निर्णय
Cricket Retirement: क्रिकेट कारकीर्दीत 30 शतकं ठोकणाऱ्या फलंदाजांने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. हा फलंदाज गेल्या 6 वर्षांपासून क्रिकेटपासून दूर होता.
क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. न्यूझीलंड क्रिकेट टीमचा फलंदाज जॉर्ज वर्कर याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. वर्करने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. जॉर्जने न्यूझीलंडचं 10 एकदिवसीय आणि 2 टी 20i सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे. जॉर्जने या दरम्यान 4 अर्धशतक झळकावली. जॉर्जला उल्लेखनीय कामगिरीनंतरही सातत्याने संधी मिळाली नाही.जॉर्जची आंतरराष्ट्रीय कारकीर्द औट घटकेची ठरली. मात्र जॉर्जने क्रिकेट सोडण्याचं कारण हे दुसरं आहे. जॉर्जला चांगल्या नोकरीची संधी आल्याने त्याने क्रिकेटपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला.
जॉर्ज वर्कने काय म्हटलं?
जॉर्ज वर्कर निवृत्ती जाहीर करत आपल्या 17 वर्षाच्या व्यावसायिक कारकीर्दीचा शेवट करत असल्याचं म्हटलं. जॉर्ज आता नव्या इनिंगला सुरुवात करत आहे. जॉर्जने सेन्ट्रल डिस्ट्रिक्ट्सकडून आपल्या क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात केली. तर आपला स्थानिक क्रिकेटमधील अथेरचा सामना हा ऑकलंडकडून खेळला. तसेच जॉर्जने आजपासून 9 वर्षांआधी 2015 साली टी20I पदार्पण केलं.त्यानंतर जॉर्जला वनडे डेब्यूचीही संधी मिळाली. जॉर्जने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना नोव्हेंबर 2018 साली खेळला होता. त्यानंतर जवळपास 69 महिने क्रिकेटपासून दूर राहिला.
न्यूझीलंडच्या फलंदाजाचा क्रिकेटला रामराम
𝐇𝐀𝐍𝐆𝐈𝐍𝐆 𝐔𝐏 𝐓𝐇𝐄 𝐁𝐀𝐓 🫡
We join with @aucklandcricket & @CanterburyCrick today in paying tribute to legendary left-hander, Stags cap 2️⃣5️⃣2️⃣ GEORGE WORKER 🦌🏏
He started with us as a teenager fresh out of Palmy’ Boys High: What. A. Career. https://t.co/Dxl0wgPUrN
— Central Stags 🏏 (@CentralStags) August 13, 2024
जॉर्ज वर्करची ‘फर्स्ट क्लास’ कामगिरी
जॉर्जला त्याच्या प्रतिभेनुसार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळाली नाही. मात्र जॉर्ज एक ‘फर्स्ट क्लास’ फलंदाज होता. जॉर्जने 126 फर्स्ट क्लास सामने खेळला. जॉर्जने या 126 सामन्यांमध्ये 11 शतकांसह 6 हजार 400 धावा केल्या. तसेच जॉर्जने 160 लिस्ट ए सामन्यांमध्ये 6 हजार 721 धावा केल्या. जॉर्जने लिस्ट ए क्रिकेटमध्ये 18 शतकं झळकावली. तर 154 टी 20 सामन्यांमध्ये 1 शतकासह 3 हजार 480 धावा केल्या. जॉर्जने अशा प्रकारे क्रिकेट कारकीर्दीत एकूण 30 शतकांसह 16 हजारांपेक्षा अधिक धावा केल्या.