ENG vs NZ : न्यूझीलंडचा संकटमोचक डार्ली मिशेल, जोरदार शतक ठोकलं, लॉर्ड्सच्या सन्मान फलकावर नाव कोरलं
पहिल्या डावात मिशेलही इतर फलंदाजांप्रमाणे पूर्णपणे अपयशी ठरलाय.
नवी दिल्ली : लॉर्ड्सच्या (lords stadium) मैदानावर न्यूझीलंडचा फलंदाज डॅरिल मिशेलने (Daryl Mitchell) इंग्लंडविरुद्ध (ENG vs NZ )शानदार शतक झळकावले आहे. मिशेलने कसोटी कारकिर्दीतील हे दुसरे शतक आहे. मिशेलने तिसऱ्या दिवसाची सुरुवात 97 धावांनी केली. या शतकासह त्याने लॉर्ड्सच्या ऑनर्स बोर्डावर आपलं नाव कोरलंय. पावसामुळे खेळ उशिरा सुरु झाला. मिशेलनं दिवसाच्या पाचव्या चेंडूवर तीन धावा घेत शतक पूर्ण केलं. यासाठी त्याने 188 चेंडू घेतले. मिशेलच्या शतकामुळे इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या सामन्यात पाहुण्या संघाचे वर्चस्व दिसून येत आहे. मिशेलची ही खेळी संघाला सर्वात जास्त गरज होती त्यावेळी उपयोगी ठरली आहे. संघाला पहिल्या डावात मोठी धावसंख्या करता आली नाही. दुसऱ्या डावातही त्याची स्थिती बिकट होती. त्याने 56 धावांत चार विकेट गमावल्या होत्या. येथून मिशेलने पाय रोवला आणि टॉम ब्लंडलने त्याला साथ दिली. या दोघांनी येथून संघाची धावसंख्या 236 पर्यंत नेली आणि यासह दुसऱ्या दिवसाला खेळ संपला.
पहिल्या डावात फ्लॉप ठरला
पहिल्या डावात मिशेलही इतर फलंदाजांप्रमाणे पूर्णपणे अपयशी ठरलाय. त्यानं फक्त 13 धावा काढल्या. मिशेलने 35 चेंडूंचा सामना केला आणि तीन चौकार मारले. मात्र, दुसऱ्या डावात मिशेलने आपले प्रयत्न पूर्णत केले. शानदार शतक यावेळी त्याने झळकावले. याआधी त्याने गेल्या वर्षी जानेवारीत क्राइस्टचर्चमध्ये पाकिस्तानविरुद्ध आपले एकमेव शतक झळकावले होते. मिशेलने या सामन्यात 102 धावांची खेळी खेळली, मात्र, सामन्यात त्याने ही धावसंख्या पार केली आहे.
कर्णधार केन विल्यमसन अपयशी
न्यूझीलंड संघाचा सर्वोत्तम फलंदाज मानला जाणारा कर्णधार केन विल्यमसन या सामन्यात पूर्णपणे प्लॉप ठरलाय. त्याने आज धावाच केल्या नाहीत, असंच म्हणावं लागेल. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ दडपणाखाली आला. विल्यमसनने पहिल्या डावात दोन दावा केल्या. यानंतर दुसऱ्या डावात त्याच्या केवळ पंधरा धावा केल्या. पहिल्या डावात न्यूझीलंडची संपूर्ण फलंदाजी 132 धावात गारद झाली. इंग्लंडने फलंदाजीसह जास्त पुढे जाऊ शकले नाहीत. यजमानांचा डाव 141 धावांवर आटोपला. यानंतर दुसऱ्या डावात न्यूझीलंडची सुरुवात खूपच खराब झाली. पण मिशेल आणि ब्लंडलने शानदार भागीदारी करत संघाला चांगल्या स्थितीत आणले.