NZ vs SL : न्यूझीलंडने पहिल्या कसोटीत श्रीलंकेला झुंजवलं, दुसऱ्या दिवशीच दाखवला रंग

श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना गॅले मैदानात सुरु असून दुसरा दिवसाचा खेळ संपला आहे. न्यूझीलंडने या सामन्यात चांगली खेळी केली असून श्रीलंकेला बॅकफूटवर ढकललं आहे.

NZ vs SL : न्यूझीलंडने पहिल्या कसोटीत श्रीलंकेला झुंजवलं, दुसऱ्या दिवशीच दाखवला रंग
Image Credit source: New Zealand Twitter
Follow us
| Updated on: Sep 19, 2024 | 6:05 PM

न्यूझीलंड दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने न्यूझीलंडसाठी हा दौरा खूपच महत्त्वाचा आहे. कारण न्यूझीलंडचा संघ अंतिम फेरीच्या शर्यतीत आहे. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यात न्यूझीलंडची कामगिरी कशी असेल याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. श्रीलंकेने पहिल्या दिवशी 7 गडी गमवून 302 धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाला तेव्हा अवघ्या तीन धावात तीन विकेट गेल्या. प्रभात जयसूर्या 0, आर मेंडिस 14 आणि असिथा फर्नांडो 0 धावसंख्येवर बाद झाले. श्रीलंकेला दुसऱ्या दिवशी फक्त 3 धावा करता आल्या आणि पहिल्या डावात सर्व गडी बाद 305 धावांपर्यंत मजल मारली. या धावांचा पाठलाग करताना. न्यूझीलंडने चांगली सुरुवात केली. पहिल्या गड्यासाठी 63 धावांची भागीदारी केली. पण 17 धावांवर असताना डेवॉन कॉनवे बाद झाला. त्यानंतर टॉम लॅथम आणि केन विल्यमसन या जोडीने तग धरला. या दोघांनी 73 धावांची भागीदारी केली.

टॉम लॅथम 70 धावांवर असताना विकेट देऊन बसला. त्याने 111 चेंडूत 70 धावा केल्या. यात 6 चौकारांचा समावेश होता. केन विल्यमसन आणि रचिन रवींद्र यांनीही साजेशी भागीदारी केली. केन विल्यमसन 55 धावा करून तंबूत परतला. तर रचिन रवींद्र 39 धावा करून बाद झाला. त्यानंतर डेरिल मिचेल आणि टॉम ब्लंडल यांनी मोर्चा सांभाळला. दुसऱ्या दिवसखेर या जोडीने 59 धावांची भागीदारी केली. डेरिल मिचेल नाबाद 41, तर टॉम ब्लंडल नाबाद 18 धावांवर खेळत आहे. अजूनही श्रीलंकेकडे 50 धावांची आघाडी आहे. पण ही आघाडी न्यूझीलंड मोडून काढेल असंच वाटत आहे. न्यूझीलंडने दुसऱ्या दिवशी 4 बाद 244 धावा केल्या आहेत.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): टॉम लॅथम, डेव्हन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साऊथी (कर्णधार), एजाज पटेल, विल्यम ओरोरके.

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): दिमुथ करुणारत्ने, पथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), दिनेश चंडिमल, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा (कर्णधार), कामिंदू मेंडिस, रमेश मेंडिस, प्रभात जयसूर्या, लाहिरू कुमारा, असिथा फर्नांडो

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.