न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूची फॅन्सला हात जोडून विनंती, म्हणाला, ‘2019 च्या फायनलची…..’
जिमी निशमने आपल्या फॅन्सला एक कळकळीची विनंती केली आहे. 2019 च्या वर्ल्ड कपच्या फायनलची पुन्हा पुन्हा चर्चा करु नका, अशी विनंती त्याने फॅन्सना केली आहे. (New Zealand Player Jimmy Neesham Requested Fans Stop reminding World Cup Final 2019)
नवी दिल्ली : न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू जिमी निशमने (Jimmy Neesham) आपल्या फॅन्सला एक कळकळीची विनंती केली आहे. 2019 च्या वर्ल्ड कपच्या फायनलची सारखी सारखी आठवण करुन देऊ नका किंवा त्याच्याविषयी पुन्हा पुन्हा चर्चा करु नका, अशी विनंती त्याने फॅन्सना केली आहे. 2019 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये जिमी निशमच्या परफॉर्मन्सविषयी त्याला सोशल मीडियातनेहमी ट्रोल केलं जातं. याचमुळे कंटाळून जिमी निशमने क्रिकेट फॅन्सने ही विनंती केली आहे. (New Zealand Player Jimmy Neesham Requested Fans Stop reminding World Cup Final 2019)
जिमी निशम फॅन्सवर भडकला
प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना सोशल मीडियावरुन या ना त्या कारणाने ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. काही जण त्या ट्रोलिंगकडे लक्ष देत नाहीत तर काही जण मात्र ट्रोलर्सचा समाचार घेत असतात. जिमी निशमने देखील त्याला ट्रोल करणाऱ्या फॅन्सला सुनावलं. रविवारी एका क्रिकेट फॅन्सने त्याला 2019 च्या वर्ल्ड कप फायनलची आठवण करुन देण्याचा प्रयत्न केला. 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडला पराभवाचा सामना करावा लागला होता.
जिमीचा ट्रोलर्सला सल्ला
क्रिकेट फॅन्स जिमीला ट्रोल करताना म्हणाला, “निशमने जोफ्रा आर्चरच्या बोलिंवर सिक्सर खेचत 4 बॉलमध्ये 7 रन्स असं विजयाचं समीकरण आणून ठेवलं होतं. पण निशमने वर्ल्डकप फायनला शेवट कसा केला होता… ” यावर जिमीने भडकून ट्रोलर्सला उत्तर दिलं, “तू एक दिवस सुट्टी घे, ते चांगलं असेल…”
I still wish how neesham had finished wc final after smashing archer for a six which led equation came down to 7 off 4
— Deepak Kumar (@yash1234556) May 9, 2021
Just one day off would be nice https://t.co/v3MDpqy2ih
— Jimmy Neesham (@JimmyNeesh) May 9, 2021
न्यूझीलंड-इंग्लंडमध्ये काय महाभारत घडलं होतं?
न्यूझीलंड-इंग्लंडमध्ये 2019 च्या वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळला गेला होता ज्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला होता. इंग्लंडने सुपर ओव्हरमध्ये बॅटिंग करताना 15 रन्स केले होते. प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंडच्या संघाने देखील 6 बॉलमध्ये 15 रन्स केले होते. ही ओव्हरपण टाय झाल्याने सर्वांधिक फोर लगावले म्हणून इंग्लंडच्या संघाला विजयी घोषित करण्यात आलं होतं. जिमी निशम न्यूझीलंडला जिंकवून देण्यात अपयशी ठरला होता. या सगळ्या आठवणी निशमला दु:ख देतात, त्याचमुळे या आठवणीत तो पुन्हा जाऊ इच्छित नाही.
(New Zealand Player Jimmy Neesham Requested Fans Stop reminding World Cup Final 2019)
हे ही वाचा :
PHOTO | अक्षर पटेल आणि हसन अली आमनेसामने, 2021 मध्ये कसोटीत सर्वाधिक वेळा 5 विकेट्स कोणाच्या नावावर?
IPL 2021 | आयपीएलच्या 14 व्या मोसमातील उर्वरित सामन्यांबाबत BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीचं मोठं विधान