Cricket Retirment : टी 20 वर्ल्ड कपमध्ये निवड न झाल्याने फलंदाजाची तडकाफडकी निवृत्ती
Cricket Retirement : टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर दिग्गज आणि अनुभवी फलंदाजाने तडकाफडकी निवृत्ती घेतल्याने टीमला मोठा झटका लागला आहे.
अवघ्या काही दिवसांनी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेच्या थराराला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील 20 सहभागी संघांपैकी जवळपास बहुंताश संघांनी आपल्या पथकाची घोषणा केली आहे. क्रिकेट चाहत्यांमध्येही या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी उत्सुकतेचं वातावरण आहे. अशात क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. टी 20 वर्ल्ड कप स्पर्धते संधी न मिळाल्याने अनुभवी फलंदाजाने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. तो अनुभवी फलंदाज कोण आहे? हे जाणून घेऊयात.
न्यूझीलंडचा सलामीवीर कॉलिन मुनरो याने तडकाफडकी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आहे. कॉलिन मुनरोला गेल्या 4 वर्षांपासून टीमकडून खेळण्याची संधी मिळाली नव्हती.मुनरोने अखरेचा सामना हा 2020 साली टीम इंडिया विरुद्ध खेळला होता. मुनरोची वर्ल्ड कप संघातही निवड केलेली नाही, त्यामुळे त्याने हा निर्णय घेतलाय.
मुनरोने न्यूझीलंडचं 65 टी 20 आणि 57 वनडे सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. तसेच मुनरोने एकमेव कसोटी सामना हा 2013 साली दक्षिण आफ्रिके विरुद्ध खेळला होता. मुनरो पहिल्या डावात 0 आणि दुसऱ्या डावात 15 धावांवर आऊट झाला होता. मुनरोने डिसेंबर 2012 साली टी 20 पदार्पण केलं होतं. तसेच मुनरो न्यूझीलंडसाठी टी 20 मध्ये 3 शतकं ठोकणारा एकमेव फलंदाज आहे. तसेच मुनोरो हा 2014 आणि 2016 सालच्या टी 20 वर्ल्ड कप संघाचा सदस्य होता. तसेच न्यूझीलंड 2019 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत उपविजेता होती. मुनरो त्या संघातही होता.
मुनरो काय म्हणाला?
“न्यूझीलंडसाठी खेळणं माझ्यासाठी सर्वोच्च कामगिरी राहिली आहे. न्यूझीलंडसाठी खेळून मला बराच काळ झालाय. मात्र मी कधीच कमबॅकची आशा सोडली नाही. मात्र आता टी 20 वर्ल्ड कप संघाची घोषणा झाल्याने निवृत्तीची हीच योग्य वेळ आहे”, असं मुनरोने स्पष्ट केलं.
कॉलिन मुनरोचा क्रिकेटला अलविदा
After missing out on #T20WorldCup selection, Colin Munro has called time on his international career 👇https://t.co/hkgZbqMlk7
— ICC (@ICC) May 10, 2024
टी 20 वर्ल्ड कपसाठी न्यूझीलंड टीम : केन विल्यमसन (कॅप्टन), फिन ऍलन, ट्रेंट बोल्ट, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउदी आणि बेन सीअर्स (राखीव).