T20 World Cup 2024: स्टार खेळाडूची मोठी घोषणा, वर्ल्ड कप दरम्यान मोठा निर्णय
T20 World Cup 2024: क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. दिग्गज खेळाडूने आपला हा अखेरचा टी 20 वर्ल्ड कप असल्याचं जाहीर केलं आहे. जाणून घ्या तो आणखी काय म्हणाला?
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 20 पैकी 6 संघांनी सुपर 8मध्ये प्रवेश केला आहे. तर 10 संघांचा पत्ता कट झाला आहे. तसेच उर्वरित 4 संघांमध्ये 2 जागांसाठी जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत अनेक उलटफेर पाहायला मिळाले. पाकिस्तान, श्रीलंका आणि न्यूझीलंड यासारख्या दिग्गज संघांना स्पर्धेतून बाहेर पडण्याची वेळ ओढावली. आता या संघांचे काही सामने बाकी आहेत. मात्र आव्हान संपुष्टात आल्याने आता औपचारिकता बाकी आहे. दिग्गज खेळाडूने साखळी फेरीतील शेवटच्या सामन्याआधी आणि तिसऱ्या सामन्यानंतर मोठी घोषणा केली आहे.
टीम इंडिया विरुद्ध कॅनडा यांच्यात आज 15 जून रोजी फ्लोरिडा सामना पार पडणार आहे. त्याआधी पहाटे दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेपाळ आणि यूगांडा विरुद्ध न्यूझीलंड सामना पार पडला. दक्षिण आफ्रिकेने नेपाळवर 1 धावेने थरारक विजय मिळवला. तर न्यूझीलंडने आपल्या तिसऱ्या सामन्यात युगांडावर मात करत पहिल्या विजयाची नोंद केली. न्यूझीलंडच्या या विजयानंतर पत्रकार परिषदेत दिग्गज गोलंदाज ट्रेंट बोल्ट याने आपला हा अखेरचा वर्ल्ड कप असल्याचं जाहीर केलं.
ट्रेंट बोल्ट काय म्हणाला?
“हा माझा अखेरचा टी 20 वर्ल्ड कप असेल. मला बस इतकच सांगायचं आहे.”, असं बोल्टने म्हटलं. ट्रेंट बोल्टने 2011 साली पदार्पण केलं होतं. मात्र बोल्ट अल्पावधीतच न्यूझीलंडचा मुख्य गोलंदाज म्हणून नावारुपास आला. बोल्टने न्यूझीलंडसाठी निर्णायक कामगिरी केलीय. बोल्टने 2014 पासून ते आतापर्यंत टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व केलं आहे. बोल्टने सर्वकाही स्पष्ट केल्याने तो भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या आगामी टी 20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. न्यूझीलंडने नवख्या युगांडावर 9 विकेट्सने दणदणी विजय मिळवला.
ट्रेंट बोल्टचा अखेरचा टी 20 वर्ल्ड कप
Trent Boult confirms “This is my last T20I World Cup”. [Sportstar] pic.twitter.com/8bjTDi2LSn
— Johns. (@CricCrazyJohns) June 15, 2024
टी 20 वर्ल्ड कप 2024 साठी न्यूझीलंड टीम : केन विलियमसन (कॅप्टन), फिन एलेन, मार्क चॅपमॅन, मायकल ब्रेसवेल, ट्रेन्ट बोल्ट, डेव्हॉन कॉन्व्हे, लॉकी फर्ग्युसन, टीम साऊथी, रचीन रवींद्र, डॅरिल मिचेल, मॅट हेनरी, जिमी नीशाम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, ईश सोढी आणि बेन सियर्स (राखीव)