NZ vs PAK Live Streaming | न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यात ‘काँटे की टक्कर’,सामना कुठे पाहायला मिळणार?
New Zealand vs Pakistan Live Streaming | आयसीसी वनडे वर्ल्ड कपमधील 34 व्या सामन्यात अफगाणिस्तानने नेदरलँड्सला पराभूत केल्याने न्यूझीलंड आणि पाकिस्तानचं टेन्शन दुप्पटीने वाढलंय. त्यामुळे न्यूझीलंड-पाकिस्तान यांच्यातील सामना रंगतदार होणार आहे.
बंगळुरु | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये शनिवारी 4 नोव्हेंबर रोजी डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं आहे. क्रिकेट चाहत्यांना शनिवारी 2 सामन्यांचा थरार अनुभवायला मिळणार आहे. या डबल हेडरमधील पहिला सामना हा अत्यंत चुरशीचा असा असणार आहे. या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. दोन्ही टीमसाठी सेमी फायनलच्या दृष्टीने हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. पाकिस्तानसाठी हा सामना करो या मरो असा असणार आहे. तर न्यूझीलंडही विजय मिळवून सेमी फायनलचा प्रवास सोपा करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. या सामन्याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान सामना केव्हा?
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यात शनिवारी 4 नोव्हेंबरला सामना खेळवण्यात येणार आहे.
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान सामना कुठे?
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान सामना हा बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार आहे.
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान सामन्याला किती वाजाता सुरुवात होणार?
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान सामन्याला सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 10 वाजता टॉस होणार आहे.
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान सामना मोबाईवर मोफत कुठे पाहायला मिळणार?
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान सामना मोबाईलवर डिज्नी प्लस हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान भिडणार
Tomorrow is the biggest day in the group stage of World Cup 2023:
NZ vs PAK from 10.30 am. ENG vs AUS from 2 pm.
A cracking Super Saturday awaits for cricket fans….!!! pic.twitter.com/o9oYHXMeHM
— Johns. (@CricCrazyJohns) November 3, 2023
न्यूझीलंड क्रिकेट टीम | टॉम लॅथम (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साउथी, जेम्स नीशम, ट्रेंट बोल्ट, इश सोधी, मार्क चॅपमन, लॉकी फर्ग्युसन आणि कायले जेमिन्सन.
पाकिस्तान क्रिकेट टीम | बाबर आझम (कॅप्टन), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इफ्तिखार अहमद, सौद शकील, आगा सलमान, शाहीन आफ्रिदी, उसामा मीर, मोहम्मद वसीम जूनियर, हरिस रौफ, शादाब खान, इमाम-उल-हक, मोहम्मद नवाज आणि हसन अली.