IND vs NZ : न्यूझीलंडच्या कर्णधाराकडून टीम इंडियाच्या प्रयत्नांवर शंका, थेटच म्हणाली, ते……
न्यूझीलंडचा पुरुष आणि महिला संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. दोन्हीकडे न्यूझीलंडने भारतीय संघाला जेरीस आणलं आहे. एकीकडे पुरुष संघाने कसोटी मालिका जिंकली. तर दुसरीकडे, महिला संघाने आधी टी20 वर्ल्डकपमध्ये लोळवलं. आता वनडे मालिकेत भारताच्या हेतूवर बोट ठेवलं आहे.
न्यूझीलंडने भारतीय संघाला एका पाठोपाठ एक धक्के देण्यास सुरुवात केली आहे. मेन्स आणि वुमन्स संघाने भारतीय संघाला वेठीस धरलं आहे. वर्ल्डकप, टी20 वर्ल्डकप, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर आता महिला टी20 वर्ल्डकप आणि आता कसोटी मालिकेत न्यूझीलंडने भारताला धक्के दिले आहेत. ऑक्टोबर महिना भारतीय संघासाठी निराशाजनक राहिला आहे. न्यूझीलंडकडून पराभवाचं तोंड पाहावं लागत आहे. असं असताना न्यूझीलंडकडून भारतीय संघाच्या कामगिरीवर बोट ठेवलं आहे. न्यूझीलंडच्या महिला संघाची कर्णधार सोफी डिव्हाईनने वनडे मालिकेतील दुसरा सामना जिंकल्यानंतर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. डिव्हाईनने स्पष्ट सांगितलं की, दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियात जिंकण्यासाठीचे प्रयत्न दिसलेच नाहीत. पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा 59 धावांनी पराभव केला होता. मात्र दुसऱ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडने कमबॅक केलं. तसेच भारतासमोर विजयासाठी 259 धावांचं आव्हान ठेवलं आणि भारताला 183 धावांवर सर्वबाद केलं. न्यूझीलंडने दुसरा वनडे सामना 76 धावांनी जिंकला. न्यूझीलंडने दुसरा सामना जिंकत मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. या विजयानंतर न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिव्हाईनने धक्कादायक विधान केलं आहे.
टीव्ही 9 हिंदीच्या वृत्तानुसार, सोफी डिव्हाईनने दुसऱ्या वनडे सामन्यातील विजयानंतर टीम इंडियाच्या कामगिरीवर निशाणा साधला आहे. कर्णधार सोफी डिव्हाईनने पत्रकार परिषदेत सांगितलं की, ‘भारतीय संघाची फलंदाजी पाहून असं वाटत होतं की, ते जिंकण्यासाठी प्रयत्नच करत नव्हते. हे खूपच लाजिरवाणं आहे.’ न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिव्हाईन हिच्या या वक्तव्यानंतर टीम इंडियाच्या खेळण्याचा पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दुसऱ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडने विजयासाठी 259 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताचा डाव 183 धावांवर आटोपला. पण यातही नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर खेळत असलेल्या राधा यादव आणि साइमा ठाकोर यांचं योगदान राहिलं. दोघांनी दहाव्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली. त्यामुळे पराभवाचं अंतर काही अंशी कमी झालं. अन्यथा भारतीय संघाचे 8 खेळाडू 108 धावांवरच बाद झाले होते.
दोन्ही संघाचे खेळाडू
भारतीय महिला संघ: शफाली वर्मा, स्मृती मानधना, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, तेजल हसबनीस, दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, राधा यादव, सायमा ठाकोर, प्रिया मिश्रा, दयालन हेमलता, रेणुका ठाकूर, सिंग श्रेयंका पाटील, उमा चेत्री, सायली सातघरे.
न्यूझीलंड महिला संघ: सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, लॉरेन डाउन, सोफी डिव्हाईन (कर्णधार), ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेज (विकेटकीपर), जेस केर, ली ताहुहू, ईडन कार्सन, फ्रॅन जोनास, मॉली पेनफोल्ड, पॉली इंग्लिस, हॅना रोवे.