वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा न्यूझीलंड ठरला मानकरी, पहिल्यांदाच जेतेपदावर नाव कोरलं

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदावर अखेर न्यूझीलंडने नाव कोरलं आहे. दोनदा जेतेपदाचं स्वप्न भंगल्यानंतर तिसऱ्यांदा जेतेपद मिळवण्यात यश आलं आहे. तर दक्षिण अफ्रिकेला सलग दुसऱ्यांदा पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. न्यूझीलंडने पहिल्यांदाच जेतेपदावर नाव कोरलं आहे.

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा न्यूझीलंड ठरला मानकरी, पहिल्यांदाच जेतेपदावर नाव कोरलं
Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Oct 20, 2024 | 10:44 PM

न्यूझीलंडचा संघ वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा मानकरी ठरला आहे. अंतिम फेरीत जेतेपदासाठी न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात लढत झाली होती. नाणेफेकीचा कौल दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय फसल्याचं दिसलं. कारण न्यूझीलंडने सावध पण सातत्यपूर्ण धावांची गती ठेवली. दुबईच्या मैदानात 150 धावा भरपूर होतील असा अंदाज आधीच होता. त्यामुळे न्यूझीलंडने त्या पद्धतीने खेळी केली. सुरुवातीला जॉर्जियाच्या रुपाने धक्का बसल्यानंतर बॅकफूटला येईल असं वाटत होतं. पण सुझी बेट्स आणि अमेलिया केर यांनी डाव सावरला. ही भागीदारी दक्षिण अफ्रिकेसाठी डोकेदुखी ठरली. त्यानंतर मधल्या फळीत ब्रूक हालिडेने चांगली फलंदाजी केली 28 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 38 धावा केल्या. न्यूझीलंडने 20 षटकात 5 गडी गमवून 158 धावा केल्या आणि विजयासाठी 159 धावांचं आव्हान दिलं. पण दक्षिण अफ्रिकेला हे आव्हान काही गाठता आलं नाही. दक्षिण अफ्रिकेला 20 षटकात 9 गडी गमवून 126 धावा करता आल्या आणि 32 धावांनी पराभव झाला. पुरुष संघाप्रमाणे महिला संघही चोकर्सचा शिक्का पुसण्यात अपयशी ठरले. सलग दुसऱ्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेने पराभवाचं तोंड पाहिलं आहे.

दक्षिण अफ्रिकेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीत पराभूत करत अंतिम फेरी गाठली होती. पण अंतिम फेरीत साजेशी कामगिरी करता आली नाही. 159 धावांचा पाठलाग करताना धावांची गती मंदावली होती. तसेच विकेट जाण्याची भीती स्पष्ट दिसत होती. त्याचा परिणाम धावगतीवर झाला आणि हळूहळू करत न्यूझीलंडने सामन्यावर पकड मिळवली. दरम्यान, न्यूझीलंडने साखळी फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना गमवला होता. पण जेतेपदाच्या शर्यतीत वरचढ ठरला आणि अखेर नवव्या पर्वात जेतेपद मिळवण्यात यशस्वी ठरला. वुमन्स टी20 वर्ल्डकप जिंकणारा न्यूझीलंड हा चौथा संघ ठरला आहे. यापूर्वी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजने जेतेपदावर नाव कोरलं आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

न्यूझीलंड महिला (प्लेइंग इलेव्हन): सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, सोफी डिव्हाईन (कर्णधार), ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेज (डब्ल्यू), रोझमेरी मायर, ली ताहुहू, ईडन कार्सन, फ्रॅन जोनास.

दक्षिण आफ्रिका महिला (प्लेइंग इलेव्हन): लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, अनेके बॉश, क्लो ट्रायॉन, मारिझान कॅप, सुने लुस, नादिन डी क्लर्क, ॲनेरी डेर्कसेन, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), नॉनकुलुलेको म्लाबा, अयाबोंगा खाका.

Non Stop LIVE Update
मुंबईत एकाच घरात 2 भावांना उमेदवारी, भाजपकडून 99 जणांची पहिली यादी
मुंबईत एकाच घरात 2 भावांना उमेदवारी, भाजपकडून 99 जणांची पहिली यादी.
'अयोध्येच्या निकालावेळी देवापुढे बसलो अन्...',सरन्यायाधीश काय म्हणाले
'अयोध्येच्या निकालावेळी देवापुढे बसलो अन्...',सरन्यायाधीश काय म्हणाले.
भाजपच्या पहिल्याच यादीत या 99 उमेदवारांना वर्णी, बघा कोणाला संधी
भाजपच्या पहिल्याच यादीत या 99 उमेदवारांना वर्णी, बघा कोणाला संधी.
मनोज जरांगे पाटील अॅक्शन मोडमध्ये, मराठ्यांचे उमेदवार कुठे देणार?
मनोज जरांगे पाटील अॅक्शन मोडमध्ये, मराठ्यांचे उमेदवार कुठे देणार?.
काँग्रेस आणि ठाकरे गटातील वाद मिटणार? शरद पवार करणार मध्यस्थी?
काँग्रेस आणि ठाकरे गटातील वाद मिटणार? शरद पवार करणार मध्यस्थी?.
मनोज जरांगे पाटलांचा निर्धार, 'बदला घेणारच…आम्ही संपवणार म्हणजे...
मनोज जरांगे पाटलांचा निर्धार, 'बदला घेणारच…आम्ही संपवणार म्हणजे....
कुडाळच्या जागेवर राणे धनुष्यबाण चिन्हावर लढणार?लवकरच शिंदे गटात प्रवेश
कुडाळच्या जागेवर राणे धनुष्यबाण चिन्हावर लढणार?लवकरच शिंदे गटात प्रवेश.
शिवडीमध्ये कोणाची मशाल धगधगणार? समर्थकांमध्ये रंगतंय पोस्टर वॉर
शिवडीमध्ये कोणाची मशाल धगधगणार? समर्थकांमध्ये रंगतंय पोस्टर वॉर.
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, अन्...
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, अन्....
मनोज जरांगेंनी घेतली मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या प्रवक्त्यांची भेट
मनोज जरांगेंनी घेतली मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या प्रवक्त्यांची भेट.