Captain | टीमची घोषणा, डायरेक्ट बॉलरच्याच गळ्यात कर्णधारपदाची धुरा, चाहत्यांना धक्का!
सर्व क्रिकेटप्रेमींच्या नजरा या हाय व्होल्टेज सामन्याकडे आहेत. पाऊस आला आणि सामना नाही झाला तर क्रिकेटप्रेमींची निराशा होवू शकते. अशातच एका बॉलरकडे संघाच्या कर्णधारपदाची धुरा देण्यात आली आहे.
मुंबई : आशिया कप 2023 मधील तिसरा सामना टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यामध्ये होणार आहे. पाकिस्तान आणि टीम इंडिया आजच्या सामन्यासाठी सज्ज झाले असून आता फक्तस पावसाने काही व्यत्यय नाही आणलं पाहिजे. सर्व क्रिकेटप्रेमींच्या नजरा या हाय व्होल्टेज सामन्याकडे आहेत. पाऊस आला आणि सामना नाही झाला तर क्रिकेटप्रेमींची निराशा होवू शकते. अशातच एका बॉलरकडे संघाच्या कर्णधारपदाची धुरा देण्यात आली आहे.
कोण आहे तो बॉलर?
न्यूझीलंड संघाने बांगलादेश दौऱ्यासाठी संघाची घोषणा केली असून लॉकी फर्ग्यूसनकडे संघाच्या कर्णधारपदाची धूरा सोपवण्यात आलीये. नियमित कर्णधार टॉम लॅथन याला आाराम देण्यात आला आहे. भारतामध्ये वर्ल्ड कप होणार असल्याने त्याला आराम देण्याचा निर्णय न्यूझीलंडच्या टीम मॅनेजमेंटने घेतला आहे.
आतापर्यंत 53 सामन्यांत 31.04 च्या सरासरीने आणि 5.66 च्या इकॉनॉमी रेटने 85 विकेट्स घेतल्या आहेत. 45 धावांत 5 बळी ही त्याची यावन डे फॉरमॅटमधील सर्वोत्तम कामगिरी आहे. लॉकीने दोनदा 4 विकेट्स आणि एकदा 5 विकेट्स घेतल्या आहेत.
Lockie Ferguson is set to captain the BLACKCAPS for the first time in an international fixture during the upcoming three match ODI Series against @BCBtigers at Sher-e-Bangla National Cricket Stadium. The first ODI is on September 21st. More | https://t.co/sMQZif3SjX #BANvNZ pic.twitter.com/NpOarSuy5a
— BLACKCAPS (@BLACKCAPS) September 1, 2023
बांगलादेश मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ- लॉकी फर्ग्युसन (कॅप्टन), विल यंग, फिन ऍलन, टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, चॅड बोवेस, डेन क्लीव्हर, डीन फॉक्सक्रॉफ्ट, काइल जेमिसन, कोल मॅककॉनची, अॅडम मिल्ने, हेन्री निकोल्स, रचिन रवींद्र, ईश सोढी आणि ब्लेअर टिकनर.