क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे.न्यूझीलंड क्रिकेट टीम सप्टेंबर महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. न्यूझीलंड या भारत दौऱ्यात अफगाणिस्तान विरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. त्यानंतर न्यूझीलंड श्रीलंका दौरा करणार आहे. न्यूझीलंड श्रीलंके विरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या अशा एकूण 3 कसोटी सामन्यांसाठी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने संघ जाहीर केला आहे. टीम साऊथी हा न्यूझीलंडचं नेतृत्व करणार आहे. टॉम लॅथम याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. तसेच स्टार खेळाडू मायकल ब्रेसवेल याचं 18 महिन्यांनंतर संघात पुनरागमन झालं आहे. ब्रेसवेल याने अखेरचा सामना हा मार्च 2023 मध्ये खेळला होता. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने याबाबतची माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे.
अफगाणिस्तान आणि श्रीलंके विरूद्धच्या कसोटी सामन्यासाठी न्यूझीलंडने संघात विलियम ओ रुर्के आणि बेन सियर्स या दोघांचा समावेश केला आहे. विलियम ओ रुर्के याने कसोटी पदार्पणात धमाका केला होता. विलियम ओ रुर्केने दक्षिण आफ्रिके विरुद्ध 9 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच विलियमला ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठीही संधी देण्यात आली होती. विलियमला या सामन्यातील पहिल्या सामन्यांनंतर दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागलं होतं. त्याच्या जागी बेन सियर्स याचा समावेश करण्यात आला. सियर्सने या संधीचा फायदा घेत कांगांरु विरुद्ध दुसऱ्या कसोटीत 5 विकेट्स घेतल्या होत्या.
न्यूझीलंडने 15 सदस्यीय संघात 5 स्पिनर्सचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय उपखंडात कायम स्पिनर्ससाठी अनुकूल परिस्थिती राहिली आहे. या स्पिर्समध्ये मिचेल सँटनर, एजाज पटेल, रचीन रवींद्र, मायकल ब्रेसवेल आणि ग्लेन फिलीप्स यांचा समावेश आहे. तसेच केन विलियमसन, डेव्हॉन कॉन्व्हे, टॉम लॅथम अशा अनुभवी खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. तर टॉम ब्लंडेल याच्याकडे विकेटकीपिंगची जबाबदारी असणार आहे.
अफगाणिस्तान-श्रीलंका विरुद्धच्या कसोटी सामन्यांसाठी न्यूझीलंड टीम
The squad covers the one-off Test against @ACBofficials in India and two ICC World Test Championship against @OfficialSLC in Sri Lanka next month.
Read more | https://t.co/RB8qXPJuDS #AFGvNZ #SLvNZ pic.twitter.com/pKoxwtKFqF
— BLACKCAPS (@BLACKCAPS) August 12, 2024
अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड एकमेव सामना, 9-13 सप्टेंबर, नोएडा
पहिला सामना, 18-22 सप्टेंबर, गाले
दुसरा सामना, 26-30 सप्टेंबर, गाले
अफगानिस्तान आणि श्रीलंके विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम न्यूझीलंड : टीम साउथी (कॅप्टन), टॉम लॅथम (उपकर्णधार), टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), मायकल ब्रेसवेल, डेवोन कॉनव्हे, मॅट हेनरी, डेरिल मिशेल, विल ओ रूर्के, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स , रचीन रवींद्र, मिचेल सेंटनर, बेन सियर्स, केन विलियमसन आणि विल यंग.