IND vs WI 2nd T20 : वेस्ट इंडिजचा हुकमी एक्का निकोलस पूरन याचा टीम इंडियाविरूद्ध भीमपराक्रम

IND vs WI 2nd T20I : एकट्या निकोलस पूरन याने गोलंदाजांना पिसून काढत विजय संघाच्या पारड्यात झुकवला.  पूरन याने 67 धावांची तुफानी खेळी करत मोठा भीमपराक्रम आपल्या नावावर केला आहे. 

IND vs WI 2nd T20 : वेस्ट इंडिजचा हुकमी एक्का निकोलस पूरन याचा टीम इंडियाविरूद्ध भीमपराक्रम
Follow us
| Updated on: Aug 07, 2023 | 9:28 AM

गयाना :  वेस्ट इंडिज संघाने दुसऱ्या टी-20 (IND vs WI 2nd T20 )सामन्यामध्ये टीम इंडियाविरूद्ध 2 विकेट्सने विजय मिळवला आहे. टीम इंडियाचे फलंदाज फेल ठरल्याने प्रथम फलंदाजी करताना अवघ्या 152 धावा केलेल्या. यामध्ये आपला दुसरा सामना खेळणाऱ्या तिलक वर्मा याने केलेली अर्धशतकी खेळीने टीम इंडियाला सन्मानजनक धावसंख्या करता आली. मात्र एकट्या निकोलस पूरन याने गोलंदाजांना पिसून काढत विजय संघाच्या पारड्यात झुकवला.  पूरन याने 67 धावांची तुफानी खेळी करत मोठा भीमपराक्रम आपल्या नावावर केला आहे.

वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरन याने 40 चेंडूत 67 धावा केल्या, यामध्ये त्याने 6 चौकार आणि 4 षटकार मारले. या खेळीसह पूरन याने भारताविरूद्ध मोठा विक्रम रचलाय, टीम इंडियाविरूद्ध टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो खेळाडू बनला  आहे. निकोलस पूरन 502 धावा, अॅरॉन फिंच 500, जोस बटलर 475 आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी 438 धावा केल्या आहेत.

पहिल्याच ओव्हरमध्ये दोन विकेट गेल्यावर उतरलेल्या निकोलस पूरन याने तुफानी सुरूवात केली. पॉवर प्लेमधील सहाव्या ओव्हरमध्ये निकोलसने रवी बिश्नोईला गिऱ्हाईक बनवलं. पूरन जोपर्यंत मैदानात होता तोपर्यंत विंडिज सहज सामना जिंकेल असं वाटत होतं. मात्र तो बाद झाल्यानंतर 126 वर 4 विकेट्स असणाऱ्या विंडिजची अवस्था 129 वर 8 अशी झाली होती. मात्र अकील होसैन आणि अल्जारी जोसेफ यांनी संघाला विजय मिळवून दिला.

टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सुर्यकुमार यादव, संजू सॅमसन, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह आणि मुकेश कुमार.

वेस्ट इंडिज प्लेईंग इलेव्हन | रोवमॅन पॉवेल (कर्णधार), ब्रँडन किंग, कायल मेयर्स, जॉनसन चार्ल्स (विकेटकीपर), निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रोमारियो शेफर्ड, अकील होसैन, अल्जारी जोसेफ आणि ओबेड मॅकॉय.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.