NZ vs AFG Live Streaming: अफगाणिस्तानसमोर न्यूझीलंडचं आव्हान, सलग दुसरा विजय मिळवणार?
New Zealand vs Afghanistan T20 World Cup 2024 Live Match Score: अफगाणिस्तानकडे सलग दुसरा विजय मिळवून सुपर 8 साठी दावा मजबूत करण्याची संधी आहे. तर न्यूझीलंड विजयी सुरुवात करण्याच्या तयारीने मैदानात उतरणार आहे.
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील 14 व्या सामन्यात सी ग्रुपमधील न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान आमनेसामने असणार आहे. केन विल्यमसन न्यूझीलंडचं नेतृत्व करणार आहे. वर्ल्ड कप मोहिमेतील आपल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडसमोर घातक अफगाणिस्तानचं आव्हान असणार आहे. न्यूझीलंडचा अफगाणिस्तानला पराभूत करत विजयी सुरुवात करण्याचा प्रयत्न असणार आहे. तर अफगाणिस्तान किंवींचा धुव्वा उडवत सलग दुसरा विजय मिळवण्यासाठी सज्ज आहे. किवींनी 4 जून रोजी स्पर्धेतील 5 व्या सामन्यात युगांडावर 125 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. त्यामुळे आता अफगाणिस्तान सलग दुसऱ्यांदा बाजी मारणार की न्यूझीलंड विजयी सुरुवात करणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान सामना केव्हा, कुठे आणि कधी होणार? याबाबतची सर्व माहिती आपण जाणून घेऊयात.
न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान सामना केव्हा?
न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान सामना शनिवारी 8 जून रोजी होणार आहे.
न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याला सकाळी 5 वाजता सुरुवात होईल. तर 4 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.
न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान सामना मोबाईलवर फुकटात कुठे पाहता येईल?
न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान सामना मोबाईलवर डिज्ने प्लस हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
न्यूझीलंड टीम: केन विल्यमसन (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), फिन ऍलन, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउथी, मॅट हेन्री, ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन, रचीन रवींद्र, मायकेल ब्रेसवेल आणि मार्क चॅपमन.
न्यूझीलंड पहिल्या सामन्यासाठी सज्ज
Our @T20WorldCup campaign gets underway against Afghanistan tomorrow in Guyana! 🏆
Watch play LIVE on @skysportnz 📺 LIVE scoring at https://t.co/3YsfR1Y3Sm or the NZC app 📲 #T20WorldCup #CricketNation pic.twitter.com/M2xJuBJkab
— BLACKCAPS (@BLACKCAPS) June 7, 2024
अफगाणिस्तान टीम : राशीद खान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, अजमातुल्ला ओमरझाई, करीम जनात, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, फजलहक फारूकी, फरीद अहमद मलिक, मोहम्मद इशाक , नूर अहमद आणि नांगेलिया खरोटे.