NZ vs AFG: अफगाणिस्तान विरुद्ध पराभूत, कॅप्टन केनने कुणाला ठरवलं कारणीभूत?

Kane Williamson NZ vs AFG: केन विलियमसनच्या नेतृत्वात न्यूझीलंडला टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील आपल्या पहिल्य सामन्यात पराभूत व्हावं लागलं. कॅप्टन केन या पराभवानंतर काय म्हणाला?

NZ vs AFG: अफगाणिस्तान विरुद्ध पराभूत, कॅप्टन केनने कुणाला ठरवलं कारणीभूत?
kane williamson nz vs afg
Follow us
| Updated on: Jun 08, 2024 | 4:12 PM

न्यूझीलंड क्रिकेट टीमची आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील सुरुवात पराभवाने झाली. न्यूझीलंडला आपल्या सलामीच्या सामन्यात उलटफेर स्वीकारावा लागला. अफगाणिस्तानने न्यूझीलंडवर 84 धावांनी मात केली. रहमानउल्लाह गुरुबाज याने केलेल्या 80 धावांच्या जोरावर अफगाणिस्तानने 159 धावांपर्यंत मजल मारत न्यूझीलंडला 160 धावांचं आव्हान दिलं. मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने न्यूझीलंडला 15.2 ओव्हरमध्ये 75 धावांवर गुंडाळलं. अफगाणिस्तानकडून कॅप्टन राशिद खान आणि फझलहक फारुकी या दोघांनी 4-4 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद नबीने 2 विकेट्स घेत चांगली साथ दिली. अफगाणिस्तानचा हा सलग दुसरा विजय ठरला. न्यूझीलंडच्या या पराभवानंतर कॅप्टन केन विलियमसन याने काय म्हटलं, जाणून घेऊयात.

केनने अफगाणिस्तानच्या विजयासाठी त्याचं मोठ्या मनाने जाहीर अभिनंदन केलं. तसेच आम्हाला सरावासाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याचं म्हटलं. आता हा पराभव विसरुन पुढील सामन्याकडे आगेकूच करायला हवं, असं केनने सांगितलं. अफगाणिस्तान आमच्यावर सर्वच बाबतीत वरचढ ठरली. केनने या सामन्याबाबत आणि आगामी सामन्यांबाबत काय म्हटलं हे समजून घेऊयात.

केन पराभवानंतर काय म्हणाला?

“सर्वात आधी अफगाणिस्तानचं अभिनंदन, त्यांनी आम्हाला सर्वच बाबतीत मागेट टाकलं. त्यांनी मोठी धावसंख्या करण्यासाठी विकेट्स हातात ठेवल्या. मात्र आता हा पराभव विसरुन पुढील सामन्यासाठी आम्हाला सज्ज व्हाव लागेल”, असं केनने म्हटलं. तसेच केनने आम्हाला सरावासाठी फारसा वेळ मिळाला नसल्याचंही जाहीर केलं.

आम्ही या सामन्यासाठी खूप मेहनत घेतली. आम्हाला या सामन्यासाठी सरावासची पर्याप्त संधी आणि वेळ मिळाली नाही. 160 विजयी धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणं अवघड होतं. आम्हाला पार्टनरशीपची गरज होती. मात्र त्याच्या फिरकीपटूंमुळे आम्हाला पाठलाग करणं अवघड गेलं. आम्ही पहिल्या 10 ओव्हरमध्ये फिल्डिंग दरम्यान कमी पडलो. आम्ही पूर्ण फायदा घेऊ शकलो नाहीत”, अशी खंतही केनने बोलून दाखवली.

“आम्हाला आता योग्य दिशेने पाऊलं टाकण्याच गरज आहे. आम्ही यापेक्षा चांगले आहोत, हे माहित आहे. मात्र हा पराभव विसरुन पुढे जावं लागेल आणि आगामी सामन्यासाठी तयारी करावी लागेल. आम्ही पुढील सामन्यात जोरदार कमबॅक करु”, असा विश्वासही केनने व्यक्त केला.

अफगाणिस्तानचा सलग दुसरा विजय

दरम्यान अफगाणिस्तानचा हा सलग दुसरा विजय ठरला. अफगाणिस्तानने 4 जून रोजी सलामीच्या सामन्यात यूगांडावर 125 धावांनी विजय मिळवला. तर आता 7 जून रोजी न्यूझीलंडला 84 धावांनी पराभूत केलं. अफगाणिस्तानने दोन्ही सामन्यात विजयी धावांचा मोठ्या फरकाने बचाव करत विजय नोंदवला. त्यामुळे अफगाणिस्तानचा नेट रनरेटही मजबूत झाला आहे. अफगाणिस्तान सी ग्रुपमधून 4 गुण आणि +5.225 च्या नेट रनरेटसह पहिल्या स्थानी आहे.

न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन : केन विलियमसन (कर्णधार), फिन एलन, डेव्होन कॉनव्हे (विकेटकीपर), डेरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमॅन, मायकल ब्रेसवेल, मिचेल सेंटनर, मॅट हेनरी, ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्यूसन.

अफगानिस्तान प्लेइंग ईलेव्हन : राशिद खान (कॅप्टन), रहमानउल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, नजीबुल्लाह झद्रान, मोहम्मद नबी, गुलबदीन नाईब, अजमतुल्लाह उमरजई, करीम जनात, नूर अहमद, नवीन-उल-हक आणि फजलहक फारूकी.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.