NZ vs AUS | बुधवारपासून ऑस्ट्रेलियाच्या न्यूझीलंड दौऱ्याला सुरुवात, पहिला सामना केव्हा?
New Zealand vs Australia 1st T20i Live Streaming | ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 2 मालिका होणार आहेत. ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड टी 20 सीरिजनिमित्ताने आमनेसामने येणार आहेत.
वेलिंग्टन | वेस्ट इंडिज विरुद्ध मायदेशात टी 20, वनडे आणि कसोटी मालिका खेळल्यानंतर आता ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड दौऱ्यासाठी सज्ज झाली आहे. ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड दौऱ्यात एकूण 2 मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात टी 20 आणि कसोटी मालिका होणार आहे. न्यूझीलंड दौऱ्याची सुरुवात ही 3 सामन्यांच्या टी 20 मालिकेने होणार आहे. त्यानंतर 2 कसोटी सामने पार पडतील. मिचेल सँटनर हा टी 20 मालिकेत न्यूझीलंडचं नेतृत्व करणार आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टन्सीची जबाबदारी मिचेल मार्श याच्याकडे असणार आहे. टी 20 मालिकेतील पहिला सामना केव्हा आणि कुठे होणार हे आपण जाणून घेऊयात.
न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला टी 20 सामना केव्हा?
न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला टी 20 सामना बुधवारी 21 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला टी 20 सामना कुठे?
न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला टी 20 सामना स्काय स्टेडियम वेलिंग्टन येथे होणार आहे.
न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला टी 20 सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला टी 20 सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 11 वाजून 40 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 11 वाजून 10 मिनिटांनी टॉस होईल.
न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला टी 20 सामना टीव्हीवर कुठे पाहता येणार?
न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला टी 20 सामना भारतात टीव्हीवर पाहता येणार नाही.
न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला टी 20 सामना मोबाईलवर कुठे बघायला मिळणार?
न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला टी 20 सामना मोबाईलवर पाहण्यासाठी एमेझॉन एप डाऊनलोड करावा लागेल.
न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया टी 20 सीरिज 21 फेब्रुवारीपासून
The Chappell-Hadlee trophy will now be contested over both 50-over and T20I formats beginning with this week’s KFC T20I Series 🏏 #NZvAUS
MORE | https://t.co/aDl6ZSvL7g pic.twitter.com/aKN3jl4w2B
— BLACKCAPS (@BLACKCAPS) February 18, 2024
टी 20 सीरिजसाठी ऑस्ट्रेलिया टीम | मिचेल मार्श (कॅप्टन), जोश इंग्लिस (विकेटकीपर), डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, ग्लेन मॅक्सवेल, टिम डेव्हिड, पॅट कमिन्स, ॲडम झॅम्पा, नॅथन एलिस, जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्हन स्मिथ आणि स्पेन्सर जॉन्सन.
न्यूझीलंड क्रिकेट टीम | मिचेल सँटनर (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), फिन ऍलन, विल यंग, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ॲडम मिल्ने, टिम साउथी, जोश क्लार्कसन आणि बेन सियर्स.