NZ vs AUS | ऑस्ट्रेलियाचा 8 वर्षानंतर न्यूझीलंडमध्ये यशस्वी, पहिल्याच सामन्यात 172 धावांनी मात
New Zealand vs Australia 1st Test Highlight In Marathi | ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत विजयी सलामी दिली आहे. ऑस्ट्रेलियाने यजमान न्यूझीलंडचा 172 धावांनी धुव्वा उडवला आहे.
वेलिंग्टन | ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमने कसोटी मालिकेत न्यूझीलंड विरुद्ध विजयी सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात न्यूझीलंडवर 172 धावांनी विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला त्यांच्यात घरात 8 वर्षांनी पराभूत केलं आहे. ऑस्ट्रेलियाने याआधी न्यूझीलंडला त्यांच्याच घरात 2016 साली पराभूत केलं होतं. ऑस्ट्रेलियासाठी ऑलराउंडर कॅमरुन ग्रीन आणि नॅथन लायन या दोघांनी उल्लेखनीय कामगिरी केली. कॅमरुन ग्रीन याने पहिल्या डावात नाबाद 174 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात 34 धावांचं योगदान दिलं. तर नॅथन लायन याने एकूण 10 विकेट्स घेतल्या. लायनने पहिल्या डावात 4 आणि दुसऱ्या डावामध्ये 6 जणांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. मात्र कॅमरुन ग्रीन ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराचा मानकरी ठरला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात कॅमरुन ग्रीन याच्या 174 धावांच्या जोरावर 383 धावांपर्यंत मजल मारली. न्यूझीलंडकडून मॅट हॅनरी याने 5 विकेट्स घेतल्या. त्यानंतर न्यूझीलंडची बॅटिंग ढासाळली. न्यूझीलंडचा पहिला डाव 179 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायन याने 4 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाला 204 धावांची आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव हा 164 धावांवर आटोपला. नॅथन लायन याने सर्वाधिक 41 धावांची खेळी केली. तर न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्स याने 5 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाने 164 धावांच्या आघाडीमुळे न्यूझीलंडसमोर 369 धावांचं आव्हान ठेवलं.
त्यानंतर नॅथन लायन याने न्यूझीलंडच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात फसवलं. न्यूझीलंडची निराशाजनक सुरुवात झाली. मात्र त्यानंतर डॅरेल मिचेल याने 38 आणि युवा रचीन रवींद्र याने 59 धावांची खेळी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र हे दोघे माघारी परतताच न्यूझीलंडचा डाव आटोपला. न्यूझीलंडला दुसऱ्या डावात अवघ्या 196 धावाच करता आल्या. नॅथनने दुसऱ्या डावात 6 विकेट्स घेत सामन्यात एकूण 10 विकेट्स पूर्ण केल्या.
नॅथन लायन याचा विकेट्सचा सिक्सर
Nathan Lyon starred with a match-winning six-wicket haul in Australia’s massive win in Wellington 💪#WTC25 | #NZvAUS 📝: https://t.co/ZR2nZf4LSN pic.twitter.com/uVYZFnTcBT
— ICC (@ICC) March 3, 2024
न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | टीम साउथी (कॅप्टन), टॉम लॅथम, विल यंग, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, स्कॉट कुग्गेलिजन, मॅट हेन्री आणि विल्यम ओरोर्के.
ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्हन स्मिथ, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि जोश हेझलवूड.