NZ vs AUS | ऑस्ट्रेलियाचा ख्राईस्टचर्चमध्ये विजय, न्यूझीलंडचा 2-0 ने सुपडा साफ
NZ vs AUS 2nd Test Highlights | ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर ख्राईस्टरचर्च येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवून 2-0 अशा फरकाने मालिका आपल्या नावावर केली. ऑस्ट्रेलियाच्या अनेक फलंदाजांनी निर्णायक भूमिका बजावून न्यूझीलंडवर 3 विकेट्सने मात केली.
ख्राईस्टचर्च | ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमने न्यूझीलंडवर दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात 3 विकेट्सने विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने या विजयासह न्यूझीलंडला 2-0 अशा एकतर्फी फरकाने विजय मिळलत सुपडा साफ केला आहे. न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 279 धावांचं आव्हान ठेवलं होतं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 7 विकेट्स गमावून 65 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. मिचेल मार्श याने निर्णायक भूमिका बजावली. मिचेलने 80 धावांची खेळी केली. तर कॅप्टन पॅट कमिन्स याने 32 धावांची नाबाद खेळी केली करत एलेक्स कॅरी याच्यासह परतला. या दोघांमध्ये आठव्या विकेटसाठी 61 धावांची निर्णायक भागीदारी झाली. ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ हा 80 धावांच्या मोबदल्यात माघारी परतला होता. मात्र एलेक्स कॅरी याने मिचेल मार्श याच्यासह धावा जोडून ऑस्ट्रेलियाला विजयी करण्यात निर्णायक भूमिका बजावली.
सामन्याचा धावता आढावा
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून न्यूझीलंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं. यजमान न्यूझीलंडकडून पहिल्या डावात एकालाही 40 पेक्षा अधिक धावा करता आल्या नाहीत. न्यूझीलंडचा पहिला डाव हा 162 धावांवर आटोपला. जोश हेझलवडू याने 5 विकेट्स घेतल्या. मिचेल स्टार्क याने तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. स्टार्क या 3 विकेट्ससह ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा चौथा गोलंदाज ठरला. न्यूझीलंडने पहिल्या डावात 256 धावा केल्या. मार्नस लबुशेन याने 90 धावांची शानदार खेळी केली. मात्र इतरांनी घोर निराशा केली. न्यूझीलंडच्या मॅट हॅनरी याने 7 विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाचा डाव आटोपण्यात निर्णायक भूमिका बजावली.
न्यूझीलंडने दुसऱ्या डावातील फलंदाजीला 94 धावांच्या पिछाडीपासून सुरुवात केली. न्यूझीलंडने या प्रत्युत्तरात 372 धावा केल्या. टॉम लॅथम याने 73, केन विलियमसन याने 82 आणि डॅरेल मिचेल याने 58 धावांची खेळी केली. या चौघांच्या अर्धशतकी खेळीमुळे न्यूझीलंडला 350 पार मजल मारता आली. न्यूझीलंडने दुसऱ्या डावात 372 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 279 धावांचं आव्हान मिळालं. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स आणि नॅथन लायन या दोघांनी प्रत्येकी 4-4 विकेट्स घेतल्या.
न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | टीम साउथी (कॅप्टन), टॉम लॅथम, विल यंग, केन विल्यमसन, रचीन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, स्कॉट कुग्गेलिजन, मॅट हेन्री आणि बेन सियर्स.
ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्हन स्मिथ, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि जोश हेझलवूड