ऑकलंड: आयसीसी महिला वर्ल्डकप स्पर्धेत (ICC Womens World cup) ऑस्ट्रेलियाचा विजयाचा सिलसिला कायम आहे. ऑस्ट्रेलियाने सलग तिसरा सामना (AUS vs NZ) जिंकला आहे. न्यूझीलंडला मोठ्या फरकाने पराभूत करुन ऑस्ट्रेलियाने विजयाची हॅट्ट्रिक नोंदवली. तीन सामन्यातील हा सलग तिसरा विजय आहे. यजमान न्यूझीलंडचा (Newzeland Team) चार सामन्यातील हा दुसरा पराभव आहे. या विजयासह गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 270 धावांचे लक्ष्य ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करणं न्यूझीलंडला जमलं नाही. त्यांनी सरळ शरणागती पत्करली. या पराभवाचा परिणाम न्यूझीलंडच्या रनरेटवरही होईल. ऑस्ट्रेलियाच्या 270 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव 128 धावात संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाने 141 धावांनी विजय मिळवला. या विजयासह आयसीसी महिला वर्ल्डकपमधील आठ वर्ष जुना विक्रमही मोडला.
यजमान देशाचा महिला वर्ल्डकप स्पर्धेतील हा सर्वात मोठा पराभव आहे. याआधी हा रेकॉर्ड भारताच्या नावावर होता. आठवर्षांपूर्वी 2013 मध्ये श्रीलंकेने भारताला 138 धावांनी पराभूत केलं होतं.
Australia pull off a comprehensive 141-run win over New Zealand thanks to some big hitting with the bat and a remarkable bowling display ?#CWC22 pic.twitter.com/UnH95YQLoq
— ICC (@ICC) March 13, 2022
ऑस्ट्रेलिया समोर न्यूझीलंडचा डाव 128 धावात आटोपला
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 270 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. त्यांचे फलंदाज एकपाठोएक तंबूत परतले. भागीदारी होणं दूरच राहिलं, ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्यासमोर त्यांचा एक फलंदाजही खेळपट्टिवर टिकत नव्हता. संपूर्ण संघांचा डाव 128 धावात गडगडलाय