Video : बांगलादेशविरुद्ध न्यूझीलंडच्या गोलंदाजाची ‘ती’ चूक कॅमेऱ्याने बरोबर पकडली, आता आयसीसीकडून मिळणार शिक्षा!

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 च्या दृष्टीने प्रत्येक कसोटी सामना महत्त्वाचा आहे. आता वनडे वर्ल्डकप स्पर्धा संपली असून पुन्हा एकदा नव्या स्पर्धांच्या तयारीला सर्व संघ लागले आहेत. न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात कसोटी सामना सुरु आहे. चौथ्या दिवशी हा सामना निर्णायक स्थितीवर आला आहे. असं असताना न्यूझीलंडच्या गोलंदाजाला एक चूक चांगलीच महागात पडणार आहे.

Video : बांगलादेशविरुद्ध न्यूझीलंडच्या गोलंदाजाची 'ती' चूक कॅमेऱ्याने बरोबर पकडली, आता आयसीसीकडून मिळणार शिक्षा!
Video : न्यूझीलंडच्या गोलंदाजाने नको तीच चूक भर मैदानात केली, कॅमेऱ्याने पकडताच बांगलादेशने केली तक्रार
Follow us
| Updated on: Dec 01, 2023 | 2:28 PM

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 च्या साखळीतील पहिला सामना कसोटी सामना बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात होत आहे. या सामन्यात बांगलादेश मजबूत स्थितीत असल्याचं दिसून येत आहे. पण न्यूझीलंडचा संघ चिवट खेळीसाठी प्रसिद्ध मानला जातो. त्यामुळे बांगलादेशला सहजासहजी विजय मिळेल असं दिसत नाही. बांगलादेशने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशने सर्वबाद 310 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने सर्वबाद 317 धावा केल्याने 7 धावांची आघाडी घेतली. बांगलादेशने दुसऱ्या डावात जबरदस्त कमबॅक करत पुन्हा एकदा 338 धावा केल्या आणि न्यूझीलंडसमोर विजयासाठी 331 धावांचं आव्हान दिलं. असं सर्व असताना चौथ्या दिवशी न्यूझीलंडचा गोलंदाज ग्लेन फिलिप्स वादाच्या भोवऱ्यात अडला आहे. कॅमेऱ्यात त्याची चूक पकडली गेली असून आरोप सिद्ध झाल्यास त्यावर कारवाई होऊ शकते. फिलिप्सवर चेंडूला लाळ लावल्याचा आरोप आहे.

बांगलादेशची 33 षटकात 2 गडी बाद 104 अशी स्थिती होती. त्यामुळे 34 वं षटक फिलिप्सला सोपवण्यात आलं. नजमुल होसेन शांतो आणि मोमिनुल हक ही जोडी मैदानात होती. स्ट्राईकला नजमुल शांतो होता . पहिल्या चेंडू टाकल्यानंतर त्याने तो चेंडू मिड ऑफला मारला. पण त्यावर एकही धावा आली नाही. क्षेत्ररक्षकाने चेडू फिलिप्सकडे फेकला आणि नकळत म्हणा की जाणूनबुजून म्हणा त्याने चेंडूल लाळ लावली. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

बांगलादेशकडून या प्रकरणाची तक्रार करण्यात आली आहे. बांगलादेशचे टीम व्यवस्थापक नफीस इकबाल यांनी पंचांकडे याची तक्रार दाखल केली आहे. नफीस यांनी व्हिडीओ पाहिल्याचं सांगितलं आहे. या प्रकरणी फिलिप्स सध्या तरी कोणतीच शिक्षा सुनावलेली नाही.

नियम 41.3 अंतर्गत 1 ऑक्टोबर 2022 पासून बदल करण्यात आला आहे. कोविड 19 नंतर क्रिकेट खेळण्यास सुरुवात झाली. त्यामुळे काही नियम नव्याने लागू करण्यात आले होते. त्यानुसार चेंडूला लाळ लावण्यावर निर्बंध लादण्यात आले होते. दुसरीकडे, एसीसीने एक निरीक्षण नोंदवलं आहे की, लाळ लावणं बंद केल्यानंतर चेंडू स्विंग होण्यावर तसा काही फरक पडला नाही. खेळाडू चेंडू शाईन होण्यासाठी लाळेचा वापर करत होते.

नोव्हेंबर 2022 मध्ये नेपाळ विरुद्ध यूएई एकदिवसीय सामन्यादरम्यान अलिशान शराफूने चेंडूवर लाळ लावली होती. या प्रकरणाची आयसीसीने दखल घेतली होती. तसेच नेपाळला पाच पेनल्टी धावा देण्यात आल्या होत्या.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.