NZ vs BAN : न्यूझीलंड दुसरा कसोटी सामनाही गमावणार! तिसऱ्या दिवसअखेर बांगलादेशची आघाडी

बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांटी कसोटी मालिका सुरु आहे. पहिला कसोटी सामना जिंकत बांगलादेशने 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता दुसऱ्या कसोटी सामन्यांचा तिसरा दिवस पार पडला. यात बांगलादेशने दुसऱ्या डावात आघाडी घेतली असून न्यूझीलंडवर पराभवाची नामुष्की ओढावू शकते.

NZ vs BAN : न्यूझीलंड दुसरा कसोटी सामनाही गमावणार! तिसऱ्या दिवसअखेर बांगलादेशची आघाडी
Follow us
| Updated on: Dec 08, 2023 | 4:44 PM

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 च्या दृष्टीने प्रत्येक कसोटी सामना महत्त्वाचा आहे. प्रत्येक कसोटी सामन्यानंतर गुणतालिकेवर मोठा फरक दिसून येतो. बांगलादेशने पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करत गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि भारत या दिग्गज संघांना मागे टाकत दुसरं स्थान गाठलं आहे. तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन असलेल्या न्यूझीलंडचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास किचकट झाला आहे. असं असताना दुसऱ्या कसोटी सामन्यातही न्यूझीलंडवर पराभवाचं सावट आहे. कारण पहिल्या डावातील खेळ पाहता असंच काहीसं म्हणावं लागेल. चौथ्या दिवसअखेर सामना निर्णयाक स्थितीत येईल. पण तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बांगलादेश हा सामना जिंकू शकते अशी स्थिती आहे. बांगलादेशने हा सामना जिंकला तर मालिका 2-0 ने खिशात घालेल. तसेच पाकिस्तानसोबत संयुक्तिकरित्या पहिल्या स्थानावर विराजमान होईल. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची लढत आणखी रंगतदार होईल यात शंका नाही.

दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशला पहिल्या दिवशी सर्वबाद 172 धावा करता आल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या न्यूझीलंडची स्थिती आणखी वाईट असल्याचं दिसून आलं. पहिल्या दिवसअखेर 5 गडी बाद 55 धावा होत्या. दुसऱ्या दिवशीचा संपूर्ण दिवस पावसामुळे वाया गेला. त्यामुळे तिसऱ्या दिवशी सामन्याला सुरुवात झाली आणि 180 धावांवर संपूर्ण संघ तंबूत परतला. 8 धावांची शुल्लक आघाडी न्यूझीलंडला मिळाली. पण बांगलादेशने दुसऱ्या डावात आश्वासक सुरुवात केली आहे. 2 गडी बाद 38 धावा केल्या आहेत आणि 30 धावांची आघाडी मिळवली आहे.

चौथ्या दिवशीच या सामन्याचा निकाल जवळपास स्पष्ट होईल. पाऊस पडून गेल्याने ही खेळपट्टी गोलंदाजांना पूरक आहे. त्यामुळे दुसऱ्या डावात 200 च्या आसपास धावा झाल्या तरी त्या गाठणं न्यूझीलंडला कठीण जाईल. झाकीर हसन 16 आणि मोमिनुल हक 0 या धावसंख्येवर खेळत आहेत. बांगलादेशने पहिल्या कसोटीत न्यूझीलंडला पराभूत केल्याने आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे या दोन दिवसात काय घडतं याकडे क्रीडाप्रेमींच्या नजरा लागून आहेत.

दोन्ही संघाचे खेळाडू

बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): महमुदुल हसन जॉय, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शहादत हुसेन, मेहदी हसन मिराझ, नुरुल हसन (विकेटकीपर), नईम हसन, तैजुल इस्लाम, शरीफुल इस्लाम

न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): टॉम लॅथम, डेव्हन कॉनवे, केन विल्यमसन, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, काइल जेमिसन, टिम साऊदी (कर्णधार), एजाज पटेल

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.