NZ vs BAN | बांगलादेश विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी न्यूझीलंडची घोषणा, केन विलियमसनचं कमबॅक

Bangladesh tour of New Zealand 2023 | न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश यांच्यात एकूण 3 सामन्यांची टी 20 मालिका होणार आहे. या मालिकेसाठी बांगलादेशनंतर न्यूझीलंडने टीम जाहीर केली आहे.

NZ vs BAN | बांगलादेश विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी न्यूझीलंडची घोषणा, केन विलियमसनचं कमबॅक
Follow us
| Updated on: Dec 17, 2023 | 6:20 PM

वेलिंग्टन | बांगलादेश क्रिकेट टीम सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. कसोटी, एकदिवसीय आणि टी 20 अशा एकूण 3 मालिकांचा समावेश या दौऱ्यात आहे. या दौऱ्यातील कसोटी मालिका पार पडल्यानंतर उभयसंघात एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. त्यानंतर बांगलादेशच्या न्यूझीलंड दौऱ्याची सांगता ही टी 20 सीरिजने होणार आहे. बांगलादेश विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी न्यूझीलंडची घोषणा करण्यात आली आहे. एकूण 3 सामन्यांची ही मालिका असणार आहे.

केन विलियमसन याची कॅप्टन म्हणून टीममध्ये एन्ट्री झाली आहे. केन विलियमसन या टी 20 सीरिजमध्ये न्यूझीलंडचं नेतृत्व करणार आहे. केनने नोव्हेंबर 2022 मध्ये नंतर एकही टी 20 सामना खेळला नव्हता. या दरम्यान केन 6 महिने दुखापतग्रस्त होता. केनला आयपीएलच्या 16 व्या मोसमादरम्यान फिल्डिंग करताना दुखापत झाली होती.

केन बाउंड्री लाईनवर सिक्स अडवताना पडला. त्यामुळे केनला दुखापत झाली. त्यानंतर केनने नुकत्याच पार पडलेल्या आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधून कमबॅक केलं. त्यानंतर आता केन टी 20 सीरिज खेळणार आहे. या मालिकेसाठी न्यूझीलंडचा स्टार ओपनर डेव्हॉन कॉन्वहे याला वर्कलोड मॅनेजमेंटमुळे विश्रांती देण्यात आली आहे.

तसेच न्यूझीलंड टीममध्ये मायकल ब्रेसवेल, लॉकी फर्ग्यूसन, मॅट हेनरी आणि हेनरी शिप्ली या चौघांना दुखापतीमुळे संधी मिळाली नाही. तर ट्रेन्ट बोल्ट याने आपण उपलब्ध नसल्याचं आधीच स्पष्ट केलं होतं. त्यामुळे टीममध्ये वेगवान गोलंदाज बेन सियर्स याचा समावेश करण्यात आला आहे. तसेच टीममध्ये जेम्श निशाम याचंही कमबॅक झालं आहे.

केन विलियमसन याची एन्ट्री

टी 20 मालिकेसाठी बांगलादेश टीम | नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), लिटॉन कुमेर दास, रॉनी तालुकदार, तौहीद हृदोय, शमीम हुसैन, अफिफ हुसैन ध्रुबो, सौम्या सरकार, मेहदी हसन मिराझ (उपकर्णधार), शाक महेदी हसन, मुस्तफिजुर रहमान, शोरीफुल इस्लाम, हसन मोहम्मद, हसन मोहम्मद , तन्वीर इस्लाम आणि तंजीम हसन साकीब.

टी 20 सीरिजसाठी न्यूझीलंड टीम | केन विल्यमसन (कॅप्टन), फिन ऍलन, मार्क चॅपमन, कायल जेमिन्सन, अॅडम मिल्ने, डॅरिल मिचेल, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, बेन सियर्स, टिम सायफर्ट, ईश सोधी आणि टीम साउथी.

टी 20 मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, बुधवार 27 डिसेंबर.

दुसरा सामना, शुक्रवार 29 डिसेंबर.

तिसरा सामना, रविवार 31 डिसेंबर.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.