दमदार खेळी, धमाकेदार कारनामा, युवा खेळाडूकडून टीम इंडियाच्या दिग्ग्जाचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक

टीम इंडियाच्या दिग्ग्जाचा तो वर्ल्ड रेकॉर्ड कोण ब्रेक करणार, असा सवाल गेल्या अनेक वर्षांपासून विचारण्यात येत होता. अखेर युवा बॅट्समनने तो रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

दमदार खेळी, धमाकेदार कारनामा, युवा खेळाडूकडून टीम इंडियाच्या दिग्ग्जाचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक
Follow us
| Updated on: Feb 24, 2023 | 8:46 PM

वेलिंग्टन | न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड यांच्यीतल दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यातील पहिला दिवसाचा खेळ संपला आहे. इंग्लंडने पहिल्या दिवसअखेर 3 विकेट्स गमावून 65 ओव्हरमध्ये 315 धावा केल्या. अनुभवी जो रुट आणि युवा हॅरी ब्रूक या दोघांनी शानदार शतक ठोकलं. दिवसाचा खेळ संपला तेव्हा हे दोघे नाबाद परतले. जो रुट 101 धावांवर नाबाद आहे. तर ब्रूक याने 184 धावांची नाबाद खेळी केली. ब्रूकने 184 धावांची खेळी करत संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. यासह हॅरीने अनेक दिग्ग्जांना पछाडत 145 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला.

हॅरी ब्रूकने याने न्यूझीलंड विरुद्ध 169 बॉलमध्ये नाबाद 184 धावा केल्या आहेत. हॅरीने या खेळीच्या मदतीने हॅरीने 9 कसोटी डावांमध्ये 800 धावा करणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. याआधी 9 डावांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड टीम इंडियाचा माजी फलंदाज मुंबईकर विनोद कांबळी याच्या नावावर होता. विनोद कांबळी याने 9 डावात 798 धावा केल्या होत्या. तर आता ब्रूकच्या नावावर 807 धावांची नोंद आहे.

हे सुद्धा वाचा

हॅरी ब्रूक याचा वर्ल्ड रेकॉर्ड

याआधी हर्बर्ट सुटक्लिफ याने 9 डावात 780, लिटील मास्टर सुनील गावसकर यांनी 9 इनिंग्समध्ये 778, एवर्टन वीक्स याने 9 डावात 777 धावा केल्या होत्या. मात्र ब्रूकने या सर्व दिग्ग्जांना पछाडत वयाच्या 24 व्या वर्षी वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला.

न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन | टीम साउथी (कर्णधार), टॉम लॅथम, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, विल यंग, ​​हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल, मॅट हेन्री आणि नील वॅगनर.

इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन फोक्स (विकेटकीपर), ऑली रॉबिन्सन, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लीच आणि जेम्स अँडरसन.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.