NZ vs PAK 3rd T20i : पाकिस्तानसमोर न्यूझीलंडला सलग तिसऱ्यांदा विजयी होण्यापासून रोखण्याचं आव्हान, शेजारी जिंकणार?
New Zealand vs Pakistan 3rd T20I : न्यूझीलंड क्रिकेट टीम मायकल ब्रेसवेल याच्या नेतृत्वात 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे किवी तिसरा सामना जिंकण्यासह मालिका विजयासाठी सज्ज आहेत.

न्यूझीलंड दौऱ्यावर असणाऱ्या शेजारी पाकिस्तान क्रिकेट टीमसमोर तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात यजमानांना विजयी हॅटट्रिकपासून रोखण्याचं आव्हान असणार आहे. उभयसंघात एकूण 5 सामन्यांची मालिका खेळवण्यात येत आहे. न्यूझीलंडने मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. न्यूझीलंड मालिकेत 2-0 अशा एकतर्फी फरकाने आघाडीवर आहे. त्यामुळे न्यूझीलंडकडे तिसरा सामना जिंकण्यासासह मालिका विजयाची सुवर्णसंधी आहे. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानसाठी हा ‘करो या मरो’ असा सामना आहे. पाकिस्तानला मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी विजय महत्त्वाचा आहे. त्यामुळे पाकिस्तान किवींना रोखण्यात यशस्वी होणार की तिसऱ्या सामन्यासह मालिकाही गमावणार? याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान तिसरा टी 20i सामना केव्हा?
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान तिसरा टी 20i सामना शुक्रवारी 21 मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे.
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान तिसरा टी 20i सामना कुठे?
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान तिसरा टी 20i सामना इडन पार्क, ऑकलंड येथे आयोजित करण्यात आला आहे.
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान तिसऱ्या टी 20i सामन्याला किती वाजता सुरुवात होईल?
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान तिसऱ्या टी 20i सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी सुरुवात होईल. तर त्याआधी 30 मिनिटांपूर्वी टॉस होईल.
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान तिसरा टी 20i सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान तिसरा टी 20i सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान तिसरा टी 20i सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान तिसरा टी 20i सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर पाहायला मिळेल.
पाकिस्तान संघ : सलमान आगा (कर्णधार), मोहम्मद हरीस (विकेटकीपर), हसन नवाज, इरफान खान, शादाब खान, खुशदिल शाह, अब्दुल समद, जहंदाद खान, शाहीन आफ्रिदी, अबरार अहमद, मोहम्मद अली, ओमेर युसूफ, हारिस रौफ, अब्बास आफ्रिदी, उस्मान खान आणि सुफियान मुकेम.
न्यूझीलंड संघ : मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), टीम सायफर्ट, फिन ऍलन, टिम रॉबिन्सन, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, मिशेल हे (विकेटकीपर), झॅकरी फॉल्केस, कायल जेमिसन, ईश सोधी, जेकब डफी, जेम्स नीशम, बेन सीयर्स आणि विल्यम किंवा विल्यम.