मुंबई | न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस संपला आहे. न्यूझीलंडच्या नावावर पहिला दिवस राहिला. न्यूझीलंड क्रिकेट टीमने पहिल्या दिवशी 2 विकेट्स गमावून 258 धावा केल्या. न्यूझीलंडकडून रचीन रवींद्र आणि केन विलियमसन या दोघांनी नाबाद शतकी खेळी केली आहे. दोघेही नाबाद परतले आहेत. केन विलियमसन याची कसोटी कारकीर्दीतील 30 वं शतक ठरलं. केनने यासह मोठा विक्रम केला आहे. केनने टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विकाट कोहली याला मागे टाकत वेस्ट इंडिजचे दिग्गज डॉन ब्रॅडमॅन यांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.
दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून न्यूझीलंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं. दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडला झटपट 2 झटके दिले. टॉम लेथम आणि डेव्हॉन कॉनव्हे या सलामी जोडीला दक्षिण आफ्रिकेने माघारी पाठवलं. त्यानंतर केन विलियमसन आणि रचीन रवींद्र या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी मोठी भागीदारी केली. तसेच दोघे वैयक्तिक शतकं झळकावत नाबाद राहिले. केनने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत नाबाद 118 धावा केल्या. तर रचीन 118 धावांवर नाबाद राहिला. केन-रचीन दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 200 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
केनने 259 चेंडूत नाबाद 112 धावा केल्या आहेत. केनने या खेळीत 15 चौकार लगावले. केनने या शतकासह विराट कोहली आणि डॉन ब्रॅडमन या दोघांच्या शतकांचा विक्रम मोडीत काढला. विराट आणि ब्रॅडमन या दोघांच्या नावावर कसोटीत 29 शतकांची नोंद आहे. तर केनचं हे 30 वं शतक ठरलं.
केनचं विक्रमी शतक
Kane Williamson reaching the mark in his 97th Test match and 169th Test innings for New Zealand! Only Sachin Tendulkar, Steve Smith and Matthew Hayden have reached the mark faster in Test cricket. #StatChat #NZvSA pic.twitter.com/3WJC8JevGl
— BLACKCAPS (@BLACKCAPS) February 4, 2024
न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | टिम साउथी (कॅप्टन), टॉम लॅथम, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, रचीन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मिचेल सॅन्टनर, काइल जेमिसन आणि मॅट हेन्री.
साऊथ अफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | नील ब्रँड (कर्णधार), एडवर्ड मूर, रेनार्ड व्हॅन टोंडर, झुबेर हमझा, डेव्हिड बेडिंगहॅम, कीगन पीटरसन, रुआन डी स्वार्ड, क्लाइड फॉर्च्युइन (विकेटकीपर), डुआन ऑलिव्हियर, त्शेपो मोरेकी आणि डेन पॅटरसन.