NZ vs SL, 1st ODI | न्यूझीलंडचा कारनामा, श्रीलंकाच्या त्या स्वप्नाला छेद

न्यूझीलंडने श्रीलंकेचा कसोटी मालिकेनंतर आता वनडे सीरिजमधील पहिल्या सामन्यातही धुव्वा उडवला आहे. न्यूझीलंडने श्रीलंकेवर 198 धावांनी विजय मिळवला आहे.

NZ vs SL, 1st ODI | न्यूझीलंडचा कारनामा, श्रीलंकाच्या त्या स्वप्नाला छेद
Follow us
| Updated on: Mar 26, 2023 | 1:58 AM

ऑकलंड | गोलंदाज हेनरी शिप्ले याने केलेल्या धमाकेदार कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडने  श्रीलंकेवर पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात  ऐतिहासिक विजय मिळवला आहे. न्यूझीलंडने श्रीलंकेला विजयासाठी 275 धावांचे आव्हान दिले होते. मात्र न्यूझीलंडला श्रीलंकेने 20 ओव्हरच्या आतच ऑलआऊट केलं. यासह न्यूझीलंडने 198 धावांच्या फरकाने मोठा विजय मिळवला.  हेनरी शिप्ले हा न्यूझीलंडच्या विजयाचा हिरो ठरला. शिप्ले याने 5 विकेट्स घेत श्रीलंकेला जोरदार पंच दिला. न्यझीलंडने या विजयासह 1-0 ने आघाडी घेतलीय.

श्रीलंकेकडून फक्त 3 जणांनााच दुहेरी आकडा गाठता आला. एंजलो मॅथ्युज याने 18, चमिका करुणारत्ने 11 आणि लहिरु कुमारा याने 10 धावा केल्या. याशिवाय दोघांना भोपळही फोडता आला नाही. तर दिलशान मधुशंका हा 4 धावांवर नाबाद राहिला. मात्र उर्वरित 5 जणांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. न्यूझीलंडकडून शिप्लेव्यतिरिक्त डॅरेल मिचेल आणि ब्लेर टिकनेर या दोघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

न्यूझीलंडची बॅटिंग

दरम्यान त्याआधी श्रीलंकेने टॉस जिंकून न्यूझीलंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं. न्यूझीलंडने या संधीचा फायदा घेतला. किवींनी पूर्ण 50 ओव्हर खेळता आलं नाही. मात्र तरीही श्रीलंकेने 49.3 ओव्हरमध्ये ऑलआऊट 274 धावा केल्या. अशाप्रकारे न्यूझीलंडने श्रीलंकेसमोर सन्मानजनक आव्हान ठेवलं. न्यूझीलंडकडून फिन एलेन याने सर्वाधिक 51 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर रचिन रविंद्र याने 49 धावा केल्या. तर डॅरेल मिचेल 47 रन्स करुन माघारी परतला.

ग्लेन फिलिप्स ने 39 धावांचं योगदान दिलं. विल यंग याने 26 धावा केल्या. चॅड बोवेस याने 14 रन्स केल्या. इश सोढी याने 10 धावा जोडल्या. ब्लेअर टिकनर (6*) आणि हेन्नी शिपले या दोघांनी प्रत्येकी 6 धावा केल्या. तर टॉम लॅथम याने सर्वात कमी 5 धावा केल्या. तर मॅट हॅनरी याला भोपळही फोडता आला नाही.

श्रीलंकेकडून सी करुणारत्ने याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. लहिरु कुमारा आणि राजिथा या दोघांनी प्रत्येकी 2 फलंदाजाना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर दिलशान आणि कॅप्टन शनाका या दोघांनी 1-1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.

न्यूझीलंड वर्ल्ड कप सुपर लीगमध्ये अव्वलस्थानी

दरम्यान या विजयासह न्यूझीलंडने मोठा कारनामा केलाय. न्यूझीलंड वर्ल्ड कप सुपर लीगमध्ये अव्वलस्थानी झेप घेतली आहे. यासह न्यूझीलंडचे एकूण 22 सामन्यात 160 पॉइंट्स झाले आहेत. जर न्यूझीलंडने या 3 सामन्यांची मालिका 3-0 च्या फरकाने जिंकली, तर वनडे रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलियाला पछाडत नंबर 1 टीम ठरेल. ऑस्ट्रेलियाने नुकतंच टीम इंडियाला एकदिवसीय मालिकेत 2-1 ने पराभूत करत अव्वल स्थानी झेप घेतली आहे.

श्रीलंकेला मोठा फटका

श्रीलंकेला या विजयासह थेट पात्र करण्याची संधी होती मात्र तसं होऊ शकलं नाही. श्रीलंका सुपर लीगमध्ये 77 पॉइंट्सस ह 10 व्या स्थानी आहे. या मालिकेतील अजून 2 सामने उर्वरित आहेत. जर श्रीलंकेला थेट प्रवेश हवा असेल, तर उर्वरित 2 सामने जिंकून पुढील समीकरणावर अवलंबून रहावं लागणार आहे. सुपर लीगमध्ये पहिल्या 8 संघांना वर्ल्ड कपसाठी थेट प्रवेश मिळतो. यंदा एकदिवसीय वर्ल्ड कपचं यजमानपद हे भारताकडे आहे.

न्यूझीलंडचा धमाकेदार विजय

न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन | टॉम लॅथम (कर्णधार आणि विकेटकीपर), फिन ऍलन, चॅड बोवेस, विल यंग, ​​डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, हेन्री शिपले, ईश सोधी, मॅट हेन्री आणि ब्लेअर टिकनर.

श्रीलंका प्लेइंग इलेव्हन | दासुन शानाका (कॅप्टन), नुवानिडू फर्नांडो, पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), चरित असलंका, अँजेलो मॅथ्यूज, वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, कसुन राजिथा, लाहिरू कुमारा आणि दिलशान मदुशंका.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.