NZ vs SL : न्यूझीलंडला मालिका विजयाची संधी, श्रीलंका रोखणार का?
New Zealand vs Sri Lanka 2nd Odi Preview : न्यूझीलंडने या मालिकेतील पहिला सामना जिंकला असल्याने ते 1-0 ने आघाडीवर आहेत. त्यामुळे यजमानांकडे दुसऱ्या सामन्यासह मालिका जिंकण्याची संधी आहे. तर श्रीलंकेसाठी आर या पारची लढाई आहे.
न्यूझीलंड क्रिकेट टीम मायदेशात श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. उभयसंघात एकदिवसीय मालिकेआधी 3 सामन्यांची टी 20i मालिका पार पडली. यजमान न्यूझीलंडने ही मालिका 2-1 ने आपल्या नावावर केली. त्यानंतर आता ही वनडे सीरिज खेळवण्यात येत आहे. न्यूझीलंडने या मालिकेतील पहिला सामना जिंकत विजयी सलामी दिली. न्यूझीलंडने 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर घेतली आहे. आता या मालिकेतील दुसरा आणि निर्णायक सामना हा बुधवारी 8 जानेवारी रोजी सीडन पार्क हॅमिल्टन येथे होणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.
श्रीलंकेसाठी ‘करो या मरो’ सामना
श्रीलंका या मालिकेत पिछाडीवर आहे. तर न्यूझीलंड आघाडीवर आहे. श्रीलंकेला या मालिकेतील आव्हान कायम राखायचं असेल आणि मायदेशी रिकामी हाती जायचं नसेल, तर हा दुसरा सामना जिंकावा लागणार आहे.श्रीलंकेसाठी दुसरा सामना ‘करो या मरो’ असा आहे. तर दुसऱ्या बाजूला यजमान न्यूझीलंड सलग दुसऱ्या विजयासह मालिका जिंकण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी दुसरा सामना हा निर्णायक आणि चुरशीचा असणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना या सामन्यात चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळेल, यात शंका नाही.
सामना कुठे पाहता येईल?
दरम्यान दुसरा सामना हा टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर लाईव्ह मॅच मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर पाहता येईल.
वनडे सीरिजसाठी श्रीलंका टीम : चारिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कामिंदू मेंडिस, जेनिथ लियानागे, चामिंडू विक्रमसिंघे, वानिंदू हसरंगा, एशान मलिंगा, लाहिरू कुमारा, अशिथा नुवान फर्नांडो, जेनिथ नुवान फर्नांडो, लाहिरू कुमरा मदुष्का, दुनिथ वेल्लागे, मोहम्मद शिराज आणि महेश तीक्षाना.
न्यूझीलंड संघ : मिचेल सँटनर (कॅप्टन), विल यंग, रचिन रवींद्र, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिशेल हे (विकेटकीपर), नॅथन स्मिथ, मॅट हेन्री, जेकब डफी, विल्यम ओरर्क, टॉम लॅथम आणि मायकेल ब्रेसवेल.