NZ vs SL : न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका दुसरा एकदिवसीय सामना कुठे पाहता येणार?
New Zealand vs Sri Lanka 2nd Odi Live Streaming : न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात टी 20i मालिकेनंतर एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. जाणून घ्या दुसरा सामना कुठे पाहता येणार?
श्रीलंका क्रिकेट टीम सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. श्रीलंकेने या दौऱ्यातील टी 20i मालिका गमावली. न्यूझीलंडने 3 सामन्यांची टी 20i मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. न्यूझीलंडने सलग 2 सामने जिंकत मालिकेवर नाव कोरलं. तर श्रीलंकेने तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात विजय मिळवला. श्रीलंकेने या विजयासह लाज राखली आणि न्यूझीलंडला विजयी हॅटट्रिकपासून रोखलं. त्यानंतर आता उभयसंघात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. न्यूझीलंड या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे दुसरा सामना हा निर्णायक असणार आहे. उभयसंघातील दुसरा सामना कुठे होणार? हे जाणून घेऊयात.
न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका दुसरा एकदिवसीय सामना केव्हा?
न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका दुसरा एकदिवसीय सामना बुधवारी 8 जानेवारीला होणार आहे.
न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका दुसरा एकदिवसीय सामना कुठे?
न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका दुसरा एकदिवसीय सामना सीडन पार्क, हॅमिल्टन येथे होणार आहे.
न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका दुसरा एकदिवसीय सामना टीव्हीवर कुठे पाहता येणार?
न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका दुसरा एकदिवसीय सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका दुसरा एकदिवसीय सामना मोबाईलवर कुठे पाहता येणार?
न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका दुसरा एकदिवसीय सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर पाहता येईल.
न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 6 वाजता टॉस होईल.
वनडे सीरिजसाठी श्रीलंका टीम : चारिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कामिंदू मेंडिस, जेनिथ लियानागे, चामिंडू विक्रमसिंघे, वानिंदू हसरंगा, एशान मलिंगा, लाहिरू कुमारा, अशिथा नुवान फर्नांडो, जेनिथ नुवान फर्नांडो, लाहिरू कुमरा मदुष्का, दुनिथ वेल्लागे, मोहम्मद शिराज आणि महेश तीक्षाना.
न्यूझीलंड संघ : मिचेल सँटनर (कॅप्टन), विल यंग, रचिन रवींद्र, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिशेल हे (विकेटकीपर), नॅथन स्मिथ, मॅट हेन्री, जेकब डफी, विल्यम ओरर्क, टॉम लॅथम आणि मायकेल ब्रेसवेल.