NZ vs SL : श्रीलंकेसमोर न्यूझीलंडला विजयी हॅटट्रिकपासून रोखण्याचं आव्हान, कोण जिंकणार अंतिम सामना?
New Zealand vs Sri Lanka 3rd T20I Live Streaming : न्यूझीलंड श्रीलंकेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे न्यूझीलंडकडे तिसरा सामना जिंकून विजयी हॅटट्रिक करण्याची संधी आहे. तर श्रीलंकेसमोर मालिकेचा शेवट हा गोड करण्याचं आव्हान असणार आहे.
श्रीलंका क्रिकेट टीम सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. उभयसंघात टी 20I आणि एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. यजमान न्यूझीलंडने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडी घेत मालिका नावावर केली आहे. त्यामुळे न्यूझीलंडकडे तिसरा आणि अंतिम सामना जिंकून विजयी हॅटट्रिक करत श्रीलंकेला क्लीन स्वीप करण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला श्रीलंकेकडे न्यूझीलंडला रोखत शेवट गोड करण्याचं आव्हान असणार आहे. त्यामुळे उभयसंघात तिसऱ्या अंतिम सामन्यात चांगलीच चुरस पाहायला मिळू शकते. हा सामना कधी आणि कुठे पाहायला मिळणार? हे आपण जाणून घेऊयात.
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड तिसरा टी 20i सामना केव्हा?
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड तिसरा टी 20i सामना गुरुवारी 2 जानेवारी रोजी खेळवण्यात येणार आहे.
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड तिसरा टी 20i सामना कुठे?
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड तिसरा टी 20i सामना सॅक्सटन ओव्हल, नेल्सन येथे होणार आहे.
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड तिसरा टी 20i सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड तिसरा टी 20i सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 5 वाजून 15 मिनिटांनी टॉस होणार आहे.
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड तिसरा टी 20i सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड तिसरा टी 20i सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड तिसरा टी 20i सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड तिसरा टी 20i सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर पाहायला मिळेल.
श्रीलंका टीम : चरिथ असलंका (कर्णधार), पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, अविष्का फर्नांडो, वानिंदू हसरंगा, महीश तीक्षना, बिनुरा फर्नांडो, मथीशा पाथिराना, नुवान थुशारा, चामिंदू विक्रमसिंघे, असिथा फर्नांडो, जेफ्री वँडर्से, भानुका राजपक्षे आणि दिनेश चांदीमल.
न्यूझीलंड टीम : मिचेल सँटनर (कॅप्टन), टीम रॉबिन्सन, रचीन रवींद्र, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, मिचेल हे (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल, झकरी फॉल्केस, मॅट हेन्री, जेकब डफी, नॅथन स्मिथ आणि बेव्हन जेकब्स.