NZ vs SL | श्रीलंका बिघडवणार न्यूझीलंडचं सेमी फायनलचं समीकरण? सामना कुठे पाहता येणार?
New Zealand vs Sri Lanka Live Streaming | न्यूझीलंड टीमसाठी श्रीलंका विरुद्धचा सामना हा सेमी फायनलच्या हिशोबाने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा सामना रंगतदार आणि चुरशीचा होण्याची शक्यता आहे.
बंगळुरु | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 41 वा सामना हा न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात होणार आहे. वनडे वर्ल्ड कप सेमी फायनलसाठी 3 संघ निश्चित झाले आहेत. यामध्ये टीम इंडिया, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचा समावेश आहे. तर आता उर्वरित एका जागेसाठी 3 संघामध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. या 3 संघांमध्ये अफगाणिस्तान, न्यूझीलंड आणि पाकिस्तानचा समावेश आहे. त्यामुळे न्यूझीलंडसाठी सेमी फायनलच्या समीकरणानुसार हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. तर दुसऱ्या बाजूला श्रीलंकेचं आव्हान संपुष्टात आलंय. त्यामुळे श्रीलंकेला तसा ताण नाही. मात्र श्रीलंका विजय मिळवून न्यूझीलंडचा गेम करु शकते. न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामना कुठे, कधी होणार हे जाणून घेऊयात.
न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका सामना कधी?
न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका सामना गुरुवारी 9 नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे.
न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका सामना कुठे?
न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामना हा बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.
न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका सामना श्रीलंका सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होईल. तर 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका सामना टीव्हीवर कुठे पाहता येणार?
न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका सामना मोबाईलवर फ्रीमध्ये कुठे बघायला मिळेल?
न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका सामना मोबाईलवर डिज्नी प्लस हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
न्यूझीलंड क्रिकेट टीम | केन विल्यमसन (कॅप्टन), टॉम लॅथम (विकेटकीपर), डेव्हन कॉनवे, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साऊदी, ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन, कायल जेमिसन, जेम्स नीशम आणि विल यंग.
श्रीलंका क्रिकेट टीम | कुसल मेंडिस (कॅप्टन आणि विकेटकीपर), पाथुम निसांका, कुसल परेरा, सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, महेश तीक्षना, दुष्मंथा चमीरा, कसून रजिथा, दिलशान मदुशंका, दिमुथ करुणारत्ने, दुष्मंता हेमंता, दिमुथ करुणारथने, लहीरु कुमारा आणि दुनिथ वेल्लालागे.