NZ vs SL : न्यूझीलंडचं श्रीलंकसमोर 135 धावांचं आव्हान, कोण मारणार बाजी?

न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात पहिला टी20 सामना सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण श्रीलंकेच्या भेदक गोलंदाजीपुढे दाणादाण उडाली आहे.

NZ vs SL : न्यूझीलंडचं श्रीलंकसमोर 135 धावांचं आव्हान, कोण मारणार बाजी?
Follow us
| Updated on: Nov 09, 2024 | 8:55 PM

श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र कर्णधार सँटनरच्या म्हणण्याप्रमाणे काही मोठी धावसंख्या काय उभारता आली नाही. आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्याने दडपण वाढलं. त्यातल्या त्यात मायकल ब्रेसवेल आणि तळाशी आलेला झॅकरी फॉल्केस यांनी चांगली फलंदाजी केली. त्यामुळे धावसंख्या 120 च्या पार जाण्यास मदत झाली. अन्यथा न्यूझीलंडचं काय खरं नव्हतं. न्यूझीलंडने 19.3 षटकात सर्व गडी गमवून 135 धावा केल्या आणि विजयासाठी 136 धावांचं आव्हान दिलं आहे. आता हे आव्हान श्रीलंका गाठणार का? याकडे लक्ष लागून आहे. श्रीलंकेकडून मथीशा पथिराना, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेल्लालगे आणि महीश थीक्षाणा यांनी भेदक गोलंदाजी केली. दुनिथ वेल्लालागेने सर्वाधिक 3 गडी बाद केले. तर नुवान तुषारा, वानिंदु हसरंगा आणि मथीशा पथिराना यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. तर महिश थीक्षणाने एक गडी बाद केला.

वानिंदू हसरंगाने सांगितलं की, “ही आमची ताकद आहे, आमच्याकडे जागतिक दर्जाचे फिरकीपटू आहेत, नाणेफेक हरल्याने काही फरक पडत नाही. दोन्ही फिरकी गोलंदाज आणि वेगवान गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. विकेट थोडी संथ आणि वळणाची होती, त्यामुळे आम्ही सामान्य वेग आणि लयीत स्टंप-टू-स्टंप लाईन टाकली. चांगली लाईन आणि लेन्थ गोलंदाजी केल्यास विकेट्स मिळण्यास मदत होते, यासाठी 80-82 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करायला हवी. तर विकेट मिळविण्याचा वेग चांगला असायला हवा. चांगला पॉवरप्ले आम्हाला या धावसंख्येचा पाठलाग करण्यास मदत करेल.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चरित असलंका (कर्णधार), भानुका राजपक्षे, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, मथीशा पाथिराना, नुवान थुशारा.

न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): टिम रॉबिन्सन, विल यंग, ​​मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिच हे (विकेटकीपर), जोश क्लार्कसन, मिचेल सँटनर (कर्णधार), ईश सोधी, झकरी फॉल्केस, जेकब डफी

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.