NZ vs SL : न्यूझीलंडने जिंकला नाणेफेकीचा कौल, कर्णधार मिचेल सँटनरने घेतला असा निर्णय
श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची टी20 मालिका आहे. या मालिकेतील पहिला सामना रंगिरी डम्बुला आंतरराष्ट्रीय मैदानावर होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी घेतली. आता या सामन्यात कोण बाजी मारणार? याची उत्सुकता आहे.
न्यूझीलंड आणि श्रीलंका टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात आमनेसामने आले आहेत. श्रीलंकेने नुकतच न्यूझीलंडला दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत व्हाईट वॉश दिली होता. त्यानंतर न्यूझीलंडने भारताला व्हाईट वॉश दिला. आता श्रीलंकन संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघात दोन सामन्यांची टी20 मालिका होत आहे. मालिकेतील पहिला सामना रंगिरी डम्बुला आंतरराष्ट्रीय मैदानात होत आहे. न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर याने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी घेतली आहे. दोन सामन्यांची मालिका असल्याने पहिला सामना जिंकेल त्याचाच वरचष्मा असेल. त्यामुळे दोन्ही संघांची पहिल्या विजयासाठी धडपड असेल. न्यूझीलंडचा कर्णधार सँटनर सांगितलं की, “प्रथम फलंदाजी करू. कारण आज संध्याकाळी पावसाचा अंदाज असल्याने बोर्डवर जास्तीत जास्त धावा काढण्यासाठी उत्सुक आहोत.” श्रीलंकेचा कर्णधार असलंका म्हणाला की, त्यानेही प्रथम फलंदाजी केली असती, परंतु त्यांचे लक्ष्य फक्त बेसिक गोष्टी योग्यरित्या करण्याचे आहे. तीन फिरकीपटू आणि दोन वेगवान गोलंदाजांसह जाणार आहेत.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चरित असलंका (कर्णधार), भानुका राजपक्षे, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, मथीशा पाथिराना, नुवान थुशारा.
न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): टिम रॉबिन्सन, विल यंग, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिच हे (विकेटकीपर), जोश क्लार्कसन, मिचेल सँटनर (कर्णधार), ईश सोधी, झकरी फॉल्केस, जेकब डफी
दोन्ही संघांचे खेळाडू
न्यूझीलंड संघ: टिम रॉबिन्सन, विल यंग, हेन्री निकोल्स, ग्लेन फिलिप्स, मिच हे (विकेटकीपर), मिचेल सँटनर (कर्णदार), जोश क्लार्कसन, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, जेकब डफी, झकरी फॉल्क्स, नॅथन स्मिथ, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डीन फॉक्सक्रॉफ्ट.
श्रीलंकेचा संघ: पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, दिनेश चंडीमल, चारिथ असालंका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, दुनिथ वेललागे, असिथा फर्नांडो, नुवान तुषारा, मथीशा पाथिराना, बिनुरा फर्नांडो, बिनूरा फर्नांडो, बिनूरा फर्नांडो वांडरसे, कामिंदू मेंडिस, चामिंडू विक्रमसिंघे, महेश थेक्षाना