श्रीलंकेने न्यूझीलंडला 4 गडी राखून नमवलं, मालिकेत 1-0 ने आघाडी
श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची टी20 मालिका आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेने न्यूझीलंडला 4 गडी राखून पराभूत केलं. न्यूझीलंडने विजयासाठी 135 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान श्रीलंकेने 6 गडी गमवून पूर्ण केलं.
श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना श्रीलंकेने जिंकला आणि मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. न्यूझीलंडने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र न्यूझीलंडला अपेक्षित धावसंख्या उभारता आली नाही. न्यूझीलंडने 19.3 षटकात सर्व गडी गमवून 135 दधावा केल्या आणि विजयासाठी 136 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान श्रीलंकेने 19 व्या षटकात 4 गडी राखून पूर्ण केलं. खरं तर हे सोपं आव्हान असलं तरी चिवट झुंज द्यावी लागली. न्यूझीलंडमध्ये पहिलाच सामना जिंकल्याने आत्मविश्वास वाढला आहे. श्रीलंकेने भेदक गोलंदाजी केली. श्रीलंकेच्या फलंदाजांना डोकंच वर काढू दिलं नाही. दुनिथ वेल्लालगेने 20 धावा देत तीन गडी बाद केले. तर नुवान तुषारा, वानिंदु हसरंगा आणि मथीशआ पथिराना यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. महिश थीक्षाणाला एक गडी बाद करण्यात यश आलं.
श्रीलंकेची सुरुवातही काही खास झाली नाही. कुसल मेंडिसला आपलं खातंही खोलता आलं नाही. त्यानंतर कुसल पेरा, कामिंदु मेंडिस आणि चरीथ असलंका यांनी छोटी पण आवश्यक खेळी केली. कुसल परेराने सांगितलं की, ‘विकेट स्पिनर्ससाठी मदत करत होती हे आपल्या सर्वांना माहीत होते. 135 ही बरोबरीची धावसंख्या होती, पण आम्हाला फलंदाजी गटात चांगली कामगिरी करायची होती. जेव्हा चेंडू नवीन होता, तेव्हा तो फिरकीपटूंसाठी पकड घेत होता, आम्हाला गती मिळविण्यासाठी काही जोखीम पत्करावी लागली, पॉवरप्लेनंतर आम्ही एक आणि दोनवर लक्ष केंद्रित केले.”
दोन्ही संघांची प्लेइंग 11
श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चरित असलंका (कर्णधार), भानुका राजपक्षे, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, मथीशा पाथिराना, नुवान थुशारा.
न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): टिम रॉबिन्सन, विल यंग, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिच हे (विकेटकीपर), जोश क्लार्कसन, मिचेल सँटनर (कर्णधार), ईश सोधी, झकरी फॉल्केस, जेकब डफी