NZ vs WI : वेस्ट इंडिजचा पराभव, 4 फलंदाजांचं अर्धशतक, न्यूझीलंडनं प्रथमच मालिका जिंकली
वेस्ट इंडिजचा 17 चेंडूत 5 गडी राखून पराभव केला. यासह किवी संघाने 3 वनडे मालिका 2-1नं जिंकली. न्यूझीलंडच्या पुरुष संघानं प्रथमच वेस्ट इंडिजमध्ये वनडे मालिका जिंकली आहे. याविषयी जाणून घ्या..
नवी दिल्ली : ब्रिजटाऊनमध्ये झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय (One Day) सामन्यात न्यूझीलंडनं (NZ vs WI) जबरदस्त पुनरागमन केलं. शेवटचे दोन वनडे जिंकून मालिका काबीज केली. तिसऱ्या वनडेत न्यूझीलंड संघाच्या (New Zealand) विजयात एक-दोन नव्हे, तर पाच हिरो आहे. विजयाचा पाया मार्टिन गुप्टिल, डेव्हॉन कॉनवे, टॉम लॅथम आणि डॅरिल मिशेल यांनी रचला, त्यानंतर जेम्स नीशमने विजयाची इमारत उभी केली. नीशमनं 309 च्या स्ट्राईक रेटने 11 चेंडूत नाबाद 34 धावा केल्या आणि न्यूझीलंडने 17 चेंडूत 302 धावांचे लक्ष्य गाठले. वेस्ट इंडिजचा 17 चेंडूत 5 गडी राखून पराभव केला. यासह किवी संघाने 3 वनडे मालिका 2-1नं जिंकली. न्यूझीलंडच्या पुरुष संघानं प्रथमच वेस्ट इंडिजमध्ये वनडे मालिका जिंकली आहे. या मालिकेतील पहिल्या वनडेत न्यूझीलंडचा संघ हरला होता. पण, असं खेळाडूंनी असं काही केलं की हातातून गेलेला सामना त्यांनी जिंकला.
हायलाईट्स
- विजयासाठी 302 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली नाही
- फिन ऍलन 3 धावा करून बाद झाला
- मार्टिन गप्टिल आणि डेव्हन कॉनवे यांनी दुसऱ्या विकेटसाठी 100 धावांची भागीदारी केली
- गुप्टिल 57 धावा करून बाद झाला
- पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर कॉनवे (56) बाद झाला
- 128 धावांत 3 विकेट्स गमावल्यानंतर न्यूझीलंडसाठी लॅथम आणि डॅरिल मिशेल यांनी चौथ्या विकेटसाठी 103 चेंडूत 120 धावांची भागीदारी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले.
किवी कर्णधाराचा निर्णय चुकला
न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण, किवी कर्णधाराचा हा निर्णय योग्य ठरला नाही. शाई होप आणि काइल मायर्स या सलामीच्या जोडीने वेस्ट इंडिजला दणका दिला. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 173 धावांची भागीदारी केली. न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या विकेटसाठी वेस्ट इंडिजची ही दुसरी सर्वोच्च भागीदारी आहे. याआधी गॉर्डन ग्रिनीज आणि डसमंड हेन्स या जोडीने 1987 मध्ये क्राइस्टचर्चमध्ये पहिल्या विकेटसाठी नाबाद 192 धावांची भागीदारी केली होती.
सामन्यात काय झालं?
वेस्ट इंडिजची धावसंख्या 173 धावांवर असताना शाई होप ट्रेंट बोल्टचा बळी ठरला. 51 धावा करून होप बाद झाली. तो बाद होताच वेस्ट इंडिजचा डाव फसला आणि पुढच्याच षटकात मायर्सही 105 धावांची खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतला. ब्रँडन किंग आणि शामराह ब्रुक्सही स्वस्तात बाद झाले. 173 धावांवर पहिली विकेट पडल्यानंतर वेस्ट इंडिजने 18 धावांत आणखी 3 विकेट गमावल्या. मात्र, त्यानंतर कर्णधार निकोलस पूरनने आघाडी घेतली आणि अथक फलंदाजी करत 55 चेंडूत 91 धावा फटकावल्या. त्याने 4 चौकार आणि 9 षटकार मारले. त्याच्या खेळीमुळे वेस्ट इंडिजने 50 षटकांत 8 गडी गमावून 301 धावा केल्या.