NZW vs PAKW : पाकिस्तान न्यूझीलंड यांच्यात रंगला रोमांचक सामना! अखेर सुपर ओव्हरमध्ये मिळाला विजय
वुमन्स क्रिकेटमधील रोमांचक सामन्याची पर्वणी क्रीडा रसिकांना मिळाली. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत न्यूझीलंडने 2-0 ने आघाडी घेतली होती. त्यामुळे तिसरा सामना फक्त औपचारिक होता. असं असलं तरी 50 षटकांचा सामना बरोबरीत सुटल्याने सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये गेला. कसा रंगला सामना आणि सुपर ओव्हरमध्ये कोण जिंकलं? जाणून घ्या
मुंबई : न्यूझीलंड आणि पाकिस्तान वुमन्स संघात तीन सामन्यांची वनडे मालिका पार पडली हा. ही मालिका न्यूझीलंडने 2-1 ने जिंकली. सुरुवातीचे दोन सामने जिंकत न्यूझीलंडने मालिका खिशात घातली होती. त्यामुळे तिसरा सामना नाममात्र होता. पण पाकिस्तानला आपली लाज राखण्यासाठी हा सामना काही करून जिंकायचा होता. पाकिस्तान महिला संघाने न्यूझीलंडला चांगली झूंज दिली. 50 षटकांचा सामना ड्रॉ झाल्याने सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानने विजय मिळवला. त्यामुळे न्यूझीलंडचं पाकिस्तानला व्हाईट वॉश देण्याचं स्वप्न भंगलं. न्यूझीलंडने 8 गडी गमवून 251 धावा केल्या आणि विजयासाठी 252 धावांचं आव्हान दिलं होतं.पाकिस्तानचा संघ 50 षटकात 9 गडी गमवून 251 धावा करू शकला आमि सामना टाय झाला. अखेर या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला आणि पाकिस्तानने विजय मिळवला.
सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानचा संघ फलंदाजीसाठी उतरला आणि एकही गडी न गमावता 11 धावा केल्या. तसेच विजयासाठी 12 धावांचं आव्हान दिलं. पहिल्या चेंडूवर आलिया रियाझने चौकार मारला. त्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर 2 धावा, चौथ्या चेंडूवर 2 धावा आणि पाचव्या चेंडूवर अलियाने एक धाव घेत फातिमा सानाला स्ट्राईक दिली. सहाव्या चेंडूवर फातिमा सनाने 2 धावा घेतल्या आणि संघाच्या एकूण 11 धावा झाल्या.
Drama at Hagley Oval! The Super Over is currently underway in the third ODI 🏏#NZWvPAKW | #BackOurGirls pic.twitter.com/qmBeIC0mvH
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 18, 2023
सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानने दिलेलं 12 धावांच आव्हान गाठण्यासाठी सोफी डेव्हाईन आणि अमेलिया केर जोडी मैदानात आली. पहिल्या चेंडूवर सोफी डेव्हाईनने एक धाव घेत अमेलियाला स्ट्राईक दिली. दुसऱ्या चेंडूवर अमेलिया झेलबाद होत तंबूत परतली. त्यानंतर स्ट्राईकला आलेल्या मॅडी ग्रीनने एक धाव घेत डिवाईनला स्ट्राईक दिली. चौथ्या चेंडूवर सोफी डेव्हाईनने उत्तुंग षटकार ठोकला. पाचव्या चेंडूवर पुन्हा तिने तसाच प्रयत्न केला मात्र झेल बाद झाली. त्यामुळे हा सामना पाकिस्तानने 3 धावांनी जिंकला.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
पाकिस्तानी महिला (प्लेइंग इलेव्हन): मुनीबा अली, सिद्रा अमीन, बिस्माह मारूफ, आलिया रियाझ, नतालिया परवेझ, फातिमा सना(कर्णधार), नजिहा अल्वी(विकेटकीपर), उम्म- ई-हानी, नशरा संधू, सादिया इक्बाल, गुलाम फातिमा.
न्यूझीलंड महिला (प्लेइंग इलेव्हन): सुझी बेट्स, इसाबेला गेज(विकेटकीपर), अमेलिया केर, सोफी डेव्हाईन(कर्णधार), मॅडी ग्रीन, जॉर्जिया प्लिमर, हन्ना रो, ली ताहुहू, जेस केर, मॉली पेनफोल्ड, फ्रॅन जोनास.