World Cup 2023 मध्ये जसप्रीत बुमराह खेळण्याबाबत मोठी अपडेट समोर, पठ्ठ्याने टाकल्या 7 ओव्हर!

मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या टी-20 सामन्यात बुमराह खेळला होता. त्यानंतर तो खेळलाच नाही. टीम इंडियासाठी एक आनंंदाची आहे. स्टार खेळाडू जसप्रीत बुमराहसंदर्भात एक अपडेट समोर आली आहे.

World Cup 2023 मध्ये जसप्रीत बुमराह खेळण्याबाबत मोठी अपडेट समोर, पठ्ठ्याने टाकल्या 7 ओव्हर!
Jasprit bumrahभारताचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह गेल्या अनेक दिवसांपासून संघाबाहेर आहे. मात्र बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये नेटमध्ये नव्या दमाने गोलंदाजीचा सराव करताना दिसला. Image Credit source: AFP
Follow us
| Updated on: Jun 27, 2023 | 9:29 PM

मुंबई : यंदाच्या वर्षी वनडे वर्ल्ड कप 2023चा थरार रंगणार असून तब्बल 12 वर्षांनी भारतामध्ये होणार आहे. टीम इंडिया यंदाच्या वर्ल्ड कपची प्रबळ दावेदार मानली जात आहे. टीम इंडियाचे घरच्या मैदानावर सामने असल्याने त्याचा निश्चितच संघाला फायदा होणार आहे. टीम इंडियासाठी एक आनंंदाची आहे. स्टार खेळाडू जसप्रीत बुमराहसंदर्भात एक अपडेट समोर आली आहे.

जसप्रीत बुमराह कमबॅक करणार की नाही?

मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या टी-20 सामन्यात बुमराह खेळला होता. त्यानंतर तो खेळलाच नाही. पाठीच्या दुखापतीमुळे सध्या तो टीमच्या बाहेर आहे. दुखापतीमुळे बुमराहने मार्च महिन्यात न्यूझीलंड येथे सर्जरी केली होती. मात्र बुमराहने नॅशनल क्रिकेट अॅकॅडमी (NCA) येथे नेटमध्ये सराव सुरू केली आहे.  यादरम्यान त्याने 7 ओव्हर गोलंदाजी केली मात्र तरीसुद्धा तो खेळणार नाही याबाबत साशंकता आहे.

बुमराहची पाठदुखी टीम इंडियासाठी फार मोठी डोकेदुखी ठरत आहे. आयर्लंडविरुध्द होणाऱ्या टी-20 सामन्यासाठी बुमराह फिट असेल तर त्याला आशिया कपमध्ये खेळण्याची संधी मिळणार असल्याची माहिती समजत आहे.

टीम इंडियाचे माजी फिटनेस कोच रामजी श्रीनिवासन यांनी बुमहारबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. बुमराहच्या कमबॅकची घाई न करण्याचा सल्ला श्रीनिवासन यांनी दिला आहे. NCA मध्ये बुमराह सराव सामने खेळत आहे. त्याच्या पुनरागमनसाठी फायद्याचं ठरू शकत असल्याचं श्रीनिवासन म्हणाले.

दरम्यान, आयसीसीने मंगळवारी यंदाच्या वनडे वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. टीम इंडियाचे होणारे सामने खालीलप्रमाणे :

टीम इंडियाचे होणारे सामने :-

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया – 8 ऑक्टोबर, चेन्नई.

टीम इंडिया विरुद्ध अफगानिस्तान – 11 ऑक्टोबर, दिल्ली.

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान – 15 ऑक्टोबर, अहमदाबाद

टीम इंडिया विरुद्ध बांग्लादेश – 19 ऑक्टोबर, पुणे.

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड – 22 ऑक्टोबर, धर्मशाळा.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड – 29 ऑक्टोबर, लखनऊ.

टीम इंडिया विरुद्ध क्वालीफायर – 2 नोव्हेंबर, मुंबई.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण अफ्रीका – 5 नोव्हेंबर, कोलकाता.

टीम इंडिया विरुद्ध क्वालीफायर – 11 नोव्हेंबर, बंगळुरु.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.