World Cup 2023 मध्ये मोठा उलटफेर, फक्त एक पराभव तगड्या चार संघांवर टांगती तलवार
वर्ल्ड कपमध्ये मोठे उलटफेर झाालेले पाहायला मिळाले, यामधील सर्वात मोठा म्हणजे वर्ल्ड कप विनर इंग्लंड संघही शिकार ठरला होता. एकच नाहीतर आफ्रिका संघ परत एकदा असाच दुबळ्या संघाकडून पराभूत झाला. याचा परिणाम आता मोठ्या चार संघांवर बाहेर पडण्याची टांगती तलवार आहे.
मुंबई : वर्ल्ड कप 2023 स्पर्धेमधील सेमी फायनलचे चार संघ आता निश्चित होत असल्याचं दिसत आहे. सर्वच संघांनी आतापर्यंत अर्धे सामने खेळले आहेत. यामध्ये फक्त एकमेव भारतीय संघाने एकही सामना गमावला नाही. भारतीय संघाने सुरूवातीपासूनच स्पर्धेमध्ये आपला दबदबा कायम ठेवला आहे. रोहित शर्मा अँड कंपनी दमदार कामगिरी करत असून वर्ल्ड कपसाठी प्रबळ दावेदारी पेश केली आहे. मात्र काही संघ असे आहेत ज्यांचं वर्ल्ड कपमधील आव्हान संपत आलं आहे. यामध्ये मोठ्या संघाचाही समावेश आहे.
कोणते आहेत ते संघ?
वर्ल्ड कपमधून बाहेर पडलेल्या दोन संघांमधील बांगलादेश आणि नेदरलँड या दोन संघांचा समावेश आहे. दोन्ही संघांनी चार सामने गमावले आहेत. आता हे दोन संघ सोडले आणखी असे दोन संघ आहेत ज्यांना एक पराभव वर्ल्ड कपमधून बाहेर काढू शकतो. यामध्ये तीन मोठ्या देशाच्या संघांची नावं आहेत. पाकिस्तान, अफगानिस्तान, श्रीलंका आणि इग्लंड या संघांवर आता टांगती तलवार असणार आहे. कारण या संघानी तीन सामने गमावले आहेत. त्यामुळे फक्त एका पराभवाने संघांना आपलं बस्तान बांधून घरी जावं लागणार आहे.
आता जर पॉईंट टेबलवर नजर मारली तर भारत, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका हे संघ सेमी फायनलमध्ये जाणार असल्याचं दिसत आहे. आता चौथा संघ कोणता हे काही सामन्यातच समोर येईल, या शर्यतीमध्ये ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, इंग्लंड आणि श्रीलंका हे संघ आहेत. कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, भारताचा सामना इंग्लंडसोबत होणार असून याकडे अवघ्या क्रिकेट जगताचं लक्ष असणार आहे. वर्ल्ड कप विजेता इंग्लंड संघ विजयासाठी आपली संपूर्ण ताकद लावतील. तर भारतीय संघ आपला विजयरथ कायम ठेवण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही